विज्ञान प्रदर्शनात २०८ प्रयोग
By admin | Published: February 1, 2017 01:38 AM2017-02-01T01:38:05+5:302017-02-01T01:38:05+5:30
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने दोन दिवसीय
ग्रंथदिंडी : विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग, दोन दिवसीय प्रदर्शन
यवतमाळ : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने दोन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मंगळवारी थाटात उद्घाटन झाले. बालवैज्ञानिकांच्या प्रयोगशीलतेला वाव मिळून वैज्ञानिक निर्माण व्हावे, अशी अपेक्षा सीईओ दीपक सिंगला यांनी व्यक्त केली.
उद्घाटनापूर्वी सकाळी ९ वाजता अभ्यंकर कन्या शाळेतून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, निरंतरचे शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर, ज्येष्ठ विचारवंत उमेश वैद्य आदी उपस्थित होते. उपशिक्षणाधिकारी अशोक रोहणे, देवीदास डंभे, चंद्रप्रकाश वहाणे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल शेंडगे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षिका निताताई गावंडे, रमाबाई आंबेडकर कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका शिलाताई कोकाटे, अभ्यंकर कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता काटेवाले, चंद्रकांत वाळके, श्याम पंचभाई, सतीश काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, नागोराव चौधरी, सुरेंद्र कडू, पखाले, विजय डांगे, भूमन्ना बोमकंटीवार, डॉ. प्रवीण जोशी, डॉ. रमजान विराणी, राजेश मदने, अशोक पोले, विजय खरोडे आदी उपस्थित होते. यावेळी अँग्लो हिंदी विद्यालयाच्या चमूने स्वागतगीत सादर केले.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले. प्राथमिक, माध्यमिक व प्रयोगशाळा परिचर विभागाकडून २०८ साधनांची मांडणी झाल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन विजय विसपुते यांनी केले. तर आभार अनिल शेंडगे यांनी मानले. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी भेट देवून मांडणी केलेल्या प्रयोगांची पाहणी केली. (स्थानिक प्रतिनिधी)