आठ महिन्यांत गेले तब्बल २१ जणांचे बळी, पांढरकवडा राष्ट्रीय, राज्य मार्ग : खड्डेमय रस्ते, नियमांचे उल्लंघन ठरतेय कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:50 AM2021-09-10T04:50:43+5:302021-09-10T04:50:43+5:30

परिसरातील अपघातांची व बळी जाण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बहुतांश अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर व राज्य मार्गावर एक ...

21 killed in eight months, Pandharkavada National, State Roads | आठ महिन्यांत गेले तब्बल २१ जणांचे बळी, पांढरकवडा राष्ट्रीय, राज्य मार्ग : खड्डेमय रस्ते, नियमांचे उल्लंघन ठरतेय कारणीभूत

आठ महिन्यांत गेले तब्बल २१ जणांचे बळी, पांढरकवडा राष्ट्रीय, राज्य मार्ग : खड्डेमय रस्ते, नियमांचे उल्लंघन ठरतेय कारणीभूत

Next

परिसरातील अपघातांची व बळी जाण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बहुतांश अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर व राज्य मार्गावर एक ते दोन फुटांचे खड्डे पडल्याने दुचाकी व इतर वाहने त्यात उसळून अपघात होत असल्याचे सांगितले जात आहे, तर काही अपघात हे भरधाव वेगाने व नियमांचे उल्लंघन केल्याने झाल्याचे दिसून येत आहे. पांढरकवडा तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ जातो. या मार्गावर नेहमी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. रात्रंदिवस या मार्गावरून अवजड वाहने धावतात. त्यामुळे अपघात नित्याचेच झाले आहे. या मार्गावर दररोज किरकोळ अपघात घडतात. महिन्यातून किमान एक, दोन मोठे अपघात घडतात. त्यात नाहक वाहनधारक तथा लगतच्या ग्रामस्थांचा बळी जातो. मागील आठवड्यात केळापूर येथील इसमाचा अशाच अपघातात बळी गेला, तर बुधवारी रात्रीदरम्यान पुन्हा साखरा गावाजवळ अपघात होऊन एका अज्ञात इसमाचा बळी गेला आहे. अपघातांची आणि बळी जाणाऱ्यांची मालिका सतत सुरूच आहे. ती खंडित होण्याचे नाव घेत नाही. यातील कित्येक अपघात हे रस्त्यावर पडलेल्या मोठंमोठ्या खड्यामुळे व दयनीय रस्त्यामुळे तर काही अपघात हे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने घडल्याचे समोर आले. महामार्गाची नियमित देखभाल व दुरूस्ती होत नसल्याने सतत अपघात घडत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी हॉटेल्स, धाबे, बार आहेत. ट्रकचालक व इतर वाहनचालक आपली वाहने महामार्गावरच उभी करून तासनतास तशीच उभी ठेवतात. त्याचा परिणाम रात्री अशा उभ्या वाहनांना धडक दिली जाते. अशा अपघातांचीही संख्या भरपूर वाढत आहे. जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत या ८ महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रीय व राज्य मार्गावर झालेल्या अपघातांत तब्बल २१ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृतकाच्या कुटुंबाची व समाजाची किती हानी झाली असेल, याची कल्पना कदाचित शासनकर्त्यांना नसावी. त्यामुळेच दरवर्षी अपघातांचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अनेक गावांना उड्डाणपुलांची आवश्यकता आहे, त्याकडेही लोकप्रधिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातून गेलेला नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ४४ हा सोनुर्लीफाटा ते पिंपळखुटी असा ४५ किलोमीटर गेला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.

कोट : रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्यात उसळून अपघात होण्याच्या जास्त घटना घडल्याचे दिसून येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यानेही अपघात घडत आहेत. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. - देवाजी कुमरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पांढरकवडा

Web Title: 21 killed in eight months, Pandharkavada National, State Roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.