ट्रक-एसटी अपघातात २२ प्रवासी जखमी

By admin | Published: June 3, 2016 02:31 AM2016-06-03T02:31:59+5:302016-06-03T02:31:59+5:30

भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील २२ प्रवासी जखमी झाले.

22 passengers injured in truck-ST accident | ट्रक-एसटी अपघातात २२ प्रवासी जखमी

ट्रक-एसटी अपघातात २२ प्रवासी जखमी

Next

हिवरीची घटना : चालकासह दोन गंभीर
हिवरी : भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील २२ प्रवासी जखमी झाले. हा अपघात यवतमाळ-आर्णी मार्गावरील हिवरी येथे गुरुवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास घडला.
दिग्रस आगाराची एसटी बस गुरुवारी सकाळी नागपूरकडे जात होती. हिवरी गावाजवळ समोरुन आलेल्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात बस चालक विश्वनाथ शिकारी (३५) रा. यवतमाळ, रुपाली रमेश मरसकोल्हे (२०) रा. हिवरी, गजानन केळकर (६०) रा. टाकळी, महेबूब अब्दूल जावेद (६०), पदमावती केळकर (५५) दोघे रा. दिग्रस, आशा रामदास ढवळे (५५) रा. पुणे, प्रदीप विलास पवार (३७) रा. आरंभी, लक्ष्मी नारायण शर्मा (७०), रा. कवठा बाजार, सुभद्रा रामा पेंदोर (६५) रा. इचोरा, दत्ता फकीरा बल्लाळ (४७) रा. धानोरा, दुलसिंग चव्हाण (५५) रा. शिरपूर, रामधन जाधव (६५) रा. शिरपूर, विलास शेरकर (५०) रा. धानोरा, नीता पंडित राठोड (२०) रा. देवगाव, प्रमोद ताजने (४०) रा. महागाव कसबा, निशा नाटकर (३०) रा. अडेगाव, राजेश नाटकर (३५) रा. अडेगाव, प्रमिला जाधव (४५) रा.आमणी, गोविंदा चव्हाण (५५) रा.आमणी, पंडित राठोड (३५) रा.देवगाव, मियाजअली हमीद अली (६६) रा. यवतमाळ, जाधव (५०) रा. दिग्रस जखमी झाले. जखमींना प्रथम हिवरी व नंतर यवतमाळला रवाना केले. (वार्ताहर)

Web Title: 22 passengers injured in truck-ST accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.