दारव्हात २३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:00:29+5:30

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. पाच प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले. नागरिकांना आरोग्यासह विविध सुविधा पुरविल्या जात आहे. नियम मोडणाऱ्यांविरूद्ध कारवाई केली जात आहे. मात्र कोरोनाला पूर्णपणे रोखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

23 active patients in Darwaza | दारव्हात २३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

दारव्हात २३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

Next
ठळक मुद्देएकूण संख्या ६२ : तिघांचा मृत्यू, उपाययोजनांना आला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२ वर पोहोचली. त्यामधील तिघांचा मृत्यू झाला असून ३६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ आहे. परंतु दिवसेंदिवस रुग्णांमध्ये भर पडत असल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. पाच प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले. नागरिकांना आरोग्यासह विविध सुविधा पुरविल्या जात आहे. नियम मोडणाऱ्यांविरूद्ध कारवाई केली जात आहे. मात्र कोरोनाला पूर्णपणे रोखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सुरुवातीच्या काळात केवळ एक रुग्ण असलेल्या दारव्हा शहरात नंतर वेगवेगळ्या कनेक्शनमधून पाच जणांना लागण झाली. त्यांच्या नजीकच्या संपर्कात येणारे अनेकजण बाधित झाल्याने आत्तापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ६२ वर पोहोचला आहे. त्यामधील तिघांचा मृत्यू झाला.
शहरात अचानक ज्या वेगाने रुग्णांची वाढ झाली, त्यामुळे प्रशासन हादरून गेले आहे. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात दाखल होऊन संपूर्ण मोर्चा आपल्या हातात घेतला. शहरात पाच प्रतिबंधित क्षेत्र तयार केले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या घराच्या १00 मीटर अंतरावरील व संपर्कात येणाºयांना तत्काळ संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येत आहे. सतत आरोग्य सर्वेक्षण सुरू आहे. या सर्व बाबींचा नियमित डाटा तयार करून जिल्हाधिकाºयांना पाठविला जात आहे. त्यानुसार सूचना देऊन नवीन चमूकडून काम करून घेतले जात आहे.
जिल्हाधिकारी एम.डी. सिंग शहराला भेट देऊन परिस्थितीचा सतत आढाव घेत आहे. तहसीलदार डॉ.संतोष डोईफोडे, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, मुख्याधिकारी धीरज गोहाड, वैद्यकीय अधीक्षक गजानन खरोडे, ठाणेदार मनोज केदारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.खलील बेग, उपजिल्हाधिकारी दळवी, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, प्रभारी तहसीलदार संजय जाधव, नायब तहसीलदार होटे, तुपसुंदरे, कापडे यांच्यासह महसूल प्रशासन, शासकीय रुग्णालय, नगरपरिषद, पोलीस, यासह संबंधित स्थानिक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी २४ तास परिश्रम घेत आहे.

दुकानांच्या वेळात आजपासून बदल
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता १५ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. आता पुन्हा रुग्ण वाढल्याने पोलीस ठाण्यात अधिकारी आणि व्यापारी बांधवांच्या बैठकीत रविवारपासून सर्व व्यवहार सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: 23 active patients in Darwaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.