लोकशाहीच्या उत्सवात 2,333 लालपरी सेवेला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 12:26 PM2024-04-08T12:26:39+5:302024-04-08T12:27:09+5:30

विदर्भात १९ आणि २६ एप्रिल अशा दोन टप्प्यांत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

2,333 to Lalpari Seva in celebration of democracy | लोकशाहीच्या उत्सवात 2,333 लालपरी सेवेला

लोकशाहीच्या उत्सवात 2,333 लालपरी सेवेला

विलास गावंडे 

यवतमाळ : लोकसभेसाठी विदर्भात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. याकरिता निवडणूक विभागाने एसटी बसची मागणी नोंदविली आहे. विदर्भातील सर्व नऊही विभागांमधून २,३३३ बस पुरविल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक एसटी बसची मागणी नागपूर विभागाकडे ३७० इतकी नोंदविण्यात आली आहे. या बसद्वारे मतदान प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचारी आणि निवडणुकीच्या साहित्याची ने-आण केली जाणार आहे. 

विदर्भात १९ आणि २६ एप्रिल अशा दोन टप्प्यांत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या कामासाठी वाहतुकीच्या दृष्टीने एसटी बसची मागणी करण्यात आली आहे. मागणीनुसार महामंडळाने निवडणूक कार्यासाठी बुकिंग करून घेतले आहे. 

Web Title: 2,333 to Lalpari Seva in celebration of democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.