जिल्ह्यातील 236 जणांची कोरोनावर मात; 121 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 08:16 PM2020-08-30T20:16:54+5:302020-08-30T20:17:00+5:30

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

236 people in the district defeated Corona; 121 new patients, three deaths | जिल्ह्यातील 236 जणांची कोरोनावर मात; 121 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

जिल्ह्यातील 236 जणांची कोरोनावर मात; 121 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

Next

यवतमाळ: वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 236  जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच 24 तासात जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 121 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. 


मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 121 जणांमध्ये 78 पुरुष व 43 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 25 पुरुष व 22 महिला, महागाव शहरातील एक पुरुष व एक महिला, झरी तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील आठ पुरुष व दोन महिला, उमरखेड शहरातील सहा पुरुष व एक महिला, नेर शहरातील दोन पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील 17 पुरुष व तीन महिला, कळंब शहरात 10 पुरुष व आठ महिला, बाभुळगावमध्ये दोन पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यात एक पुरुष व एक महिला, पुसद शहरात दोन पुरुष व पुसद तालुक्यात एक पुरुष, पांढरकवडा शहरात एक महिला, दारव्हा शहरात एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत. 


सद्यस्थितीत जिल्ह्यात 497 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 245 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 3286 झाली आहे. यापैकी 2462 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 82 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 174 जण भरती आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 234 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 48528 नमुने पाठविले असून यापैकी 46257 प्राप्त तर 2271 अप्राप्त आहेत. तसेच 42971 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: 236 people in the district defeated Corona; 121 new patients, three deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.