स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांचा २४ वा स्मृती समारोह यवतमाळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 05:00 AM2021-11-19T05:00:00+5:302021-11-19T05:00:16+5:30
२५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मातोश्री दर्डा सभागृहाच्या हिरवळीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. नंतर तीन दिवस मातोश्री दर्डा सभागृहात शिबिर चालणार आहे. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे रोहयोमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, माजी शिक्षण व उद्योगमंत्री तथा ‘लोकमत’चे एडिटर- इन- चीफ राजेंद्र दर्डा, ‘लोकमत’चे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
यवतमाळ येथे मातोश्री दर्डा सभागृहात हे मोफत ऑस्टिओपॅथी शिबिर होणार आहे. २५, २६ आणि २७, असे तीन दिवस या शिबिरात ऑस्टिओपॅथीतज्ज्ञ डाॅ. गोवर्धनलाल पाराशर गरजू रुग्णांवर उपचार करणार आहेत.
२५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मातोश्री दर्डा सभागृहाच्या हिरवळीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. नंतर तीन दिवस मातोश्री दर्डा सभागृहात शिबिर चालणार आहे. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे रोहयोमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, माजी शिक्षण व उद्योगमंत्री तथा ‘लोकमत’चे एडिटर- इन- चीफ राजेंद्र दर्डा, ‘लोकमत’चे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
हे शिबिर यवतमाळ शहर व जिल्ह्यातील रुग्णांपुरतेच मर्यादित राहणार आहे. तीनदिवसीय शिबिरात दररोज एक- एक तासाच्या पाच बॅचमध्ये प्रत्येकी ३० रुग्णांची तपासणी होईल. यात सकाळी १० ते ११, ११ ते १२, १२ ते १, ३ ते ४ आणि ४ ते ५, अशा वेळेत पाच बॅच घेतल्या जातील. गरजू रुग्णांना २२ व २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (गोधनी रोड) जाऊन नावनोंदणी करावी लागणार आहे. त्याकरिता रुग्णाचे आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांसह अनेक मान्यवरांवर डाॅ.पाराशर यांनी यशस्वी उपचार केले आहेत. आता लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या मार्गदर्शनात व सहकार्याने डाॅ.पाराशर खास यवतमाळकरांना मोफत सेवा देण्यासाठी येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २४ व्या स्मृती समारोहानिमित्त यंदा गरजू रुग्णांसाठी मोफत उपचाराचे विशेष प्रयोजन करण्यात आले आहे. जोधपूर (राजस्थान) येथील जगप्रसिद्ध ऑस्टिओपॅथीतज्ज्ञ डाॅ. गोवर्धनलाल पाराशर यांचे तीनदिवसीय उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
- जोधपूरचे जगप्रसिद्ध ऑस्टिओपॅथी तज्ज्ञ डाॅ. गोवर्धनलाल पाराशर देणार सेवा
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री संदीपान भुमरे यांची विशेष उपस्थिती
जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन
बाबूजींच्या स्मृती समारोहाचे औचित्य साधून येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारतीचे लोकार्पण होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते, तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे लोकार्पण होणार आहे.
बाबूजी यांचा स्मृती समारोह कार्यक्रम
- २४ नोव्हेंबर, बुधवार :
संगीत संध्या
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : प्रेरणास्थळ
सादरकर्ते : प्रसिद्ध गायिका हरगुण कौर (पंजाब) व प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे (महाराष्ट्र)
- २५ नोव्हेंबर, गुरुवार :
आदरांजली
वेळ : सकाळी ९ ते १०
स्थळ : प्रेरणास्थळ
सादरकर्ते : स्थानिक कलावंत
- २५ नोव्हेंबर, गुरुवार :
जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन
वेळ : सकाळी १०.४५ ते १२
स्थळ : मातोश्री दर्डा सभागृह
-२५ नोव्हेंबर, गुरुवार :
डाॅ. गोवर्धन लाल पाराशर यांच्या ऑस्टिओपॅथी कॅम्पचे उद्घाटन
वेळ : सकाळी १०.४५ ते १२
स्थळ : मातोश्री दर्डा सभागृह
- २५, २६, २७ नोव्हेंबर :
डाॅ. गोवर्धन लाल पाराशर (जोधपूर, राजस्थान) यांचे ऑस्टिओपॅथी शिबिर
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५
स्थळ : मातोश्री दर्डा सभागृह