तस्करीतील २५ जनावरे दगावली

By admin | Published: March 30, 2017 12:10 AM2017-03-30T00:10:16+5:302017-03-30T00:10:16+5:30

मध्यप्रदेशातून हैद्राबादच्या कत्तलखान्याकडे गुरांना घेऊन जाणारे दोन ट्रक ठाणेदार गुलाबराव वाघ व त्यांच्या

25 animals smuggled | तस्करीतील २५ जनावरे दगावली

तस्करीतील २५ जनावरे दगावली

Next

 जनावरांचे दोन ट्रक पकडले : पांढरकवडा पोलिसांनी केली कारवाई
पांढरकवडा : मध्यप्रदेशातून हैद्राबादच्या कत्तलखान्याकडे गुरांना घेऊन जाणारे दोन ट्रक ठाणेदार गुलाबराव वाघ व त्यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावरील ढोकी या गावाजवळ पकडले असून ९० गुरांना जीवदान मिळाले आहे. पकडण्यात आलेल्या एका ट्रेलरमधील ६५ पैकी १५ जनावरे मृत्युमुखी पडली असून दुसऱ्या ट्रकमधील ५० पैकी १० जनावरे मृत्युमुखी पडली.
मध्यरात्रीच्या सुमारास मध्यप्रदेशातून नागपुरमार्गे एक ट्रेलर व एका ट्रकमध्ये गुरे कोंबून हैद्राबादच्या कत्तलखान्याकडे जात असल्याची टीप ठाणेदार गुलाबराव वाघ यांना मिळाली. ठाणेदार वाघ, ए.पी.आय आनंद पिदुरकर, पी.एस.आय.शुभांगी मोहारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्गावरील केळापूर या गावाजवळ आपला ठिय्या लावला. मध्यरात्रीच्या सुमारास नागपुरकडून भरधाव येणारा एक दहाचाकी कंटेनर व एक ट्रक भरधाव हैद्राबादकडे जाताना दिसला. या दोन्हीही ट्रकमध्ये गुरे असल्याचा संशय ठाणेदार वाघ यांना आला. त्यांनी या दोन्हीही ट्रकचा पाठलाग करुन दोन्हीही ट्रक ढोकी या गावाजवळ पकडले.
यू.पी.२१ ए.एन.३३२१ क्रमांकाच्या दहाचाकी ट्रेलरमध्ये कोंबून भरण्यात आलेली ६५ जनावरे आढळून आली. त्यापैकी १५ जनावरे गुदमरुन मृत्युमुखी पडली होती. एम.पी.०९ एच.एफ.८१९१ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये कोंबून भरण्यात आलेली ५० जनावरे आढळून आली असून त्यांपैकी १० जनावरांचा गुदमरुन मृत्यू झाला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोन्हीही ट्रकचे चालक मात्र फरार झाले.
पोलिसांनी दुसरे चालक आणून एक ट्रक वणी तालुक्यातील रासा येथे, तर दुसरा वडगाव जंगल येथे नेला. ठाणेदार वाघ व त्यांचे सहकारी अधिक चौकशी करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

शिरपूरमध्ये २७ जनावरे पकडली
नागपूर येथून ट्रक क्रमांक एम.एच.४०-वाय.४७३४ ने तेलंगणात कत्तलीसाठी नेण्यात येणारी २७ जनावरे शिरपूर पोलिसांनी वेळाबाई फाट्याजवळ पकडले. यातील एक बैैल मृत अवस्थेत होता. ठाणेदार सागर इंगोले यांना माहिती मिळताच बुधवारी पहाटे वेळाबाई फाट्याजवळ सापळा रचून २६ जनावरांची सुटका केली. या बैैलांची किंमत पाच लाख रूपये असून ट्रकसह पोलिसांनी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी फिरोज खान रमजान खान (३०), रतीराम वखाराम राखेड (२७), अखतर अहेमद कुरेशी (२६), जुबेर सुभान शेख (२७) सर्व रा.नागपूर या तस्करांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास प्रकाश भगत करीत आहे.

 

Web Title: 25 animals smuggled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.