धनादेश अनादर प्रकरणी २५ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:43 AM2021-09-11T04:43:39+5:302021-09-11T04:43:39+5:30

आसिफ शकील मिर्झा रा. पुसद याने येथील आदर्श महिला नागरी पतसंस्थेकडून सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. जमानतदार मुदस्सर ...

25 lakh fine in check dishonor case | धनादेश अनादर प्रकरणी २५ लाखांचा दंड

धनादेश अनादर प्रकरणी २५ लाखांचा दंड

Next

आसिफ शकील मिर्झा रा. पुसद याने येथील आदर्श महिला नागरी पतसंस्थेकडून सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. जमानतदार मुदस्सर खान होते. आसिफ मिर्झा याने कर्जाची परतफेड केली नसल्याने जामीनदार मुदस्सर खान याने पतसंस्थेला १३ लाख ४५ हजार ६५५ रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश पतसंस्थेने वटविण्यासाठी टाकला असता तो परत आला. पतसंस्थेने मुदस्सर खान याला सूचना पत्र पाठवून माहिती दिली. परंतु कोणतीही दाद मिळाली नाही. त्यामुळे पतसंस्थेने मुदस्सर खान विरुद्ध कलम १३८ नुसार न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले.

या प्रकरणात न्यायाधीश एन.जी. व्यास यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आरोपीस सहा महिने तुरुंगवास व २५ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पतसंस्थेतर्फे ॲड. ए. ए. खान, ॲड. अर्जुन ठाकूर, ॲड. अनिल ठाकूर यांनी बाजू मांडली.

Web Title: 25 lakh fine in check dishonor case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.