बस अपघातात २७ जखमी
By admin | Published: January 7, 2016 03:00 AM2016-01-07T03:00:04+5:302016-01-07T03:00:04+5:30
समोरुन येणाऱ्या इंडिकाला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले.
तिवरंगजवळची घटना : इंडिका वाचविताना बसच्या तीन पलट्या
आर्णी : समोरुन येणाऱ्या इंडिकाला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले. हा अपघात आर्णी-माहूर मार्गावरील तिवरंग फाट्याजवळ बुधवारी सकाळी १० वाजता घडला. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
एसटी बस (एम.एच.४०-वाय-५८४२) बुधवारी सकाळी हिंगणघाटवरून माहूरकडे जात होती. आर्णी माहूर दरम्यान तिवरंग फाट्यावरील वळणाजवळ समोरुन अचानक इंडिका कार आली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस चालकाचे नियंत्रण गेले आणि बसने तीन पलट्या खाल्ल्या. अपघात झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. जखमींना आर्णी येथे दाखल करण्यात आले. तर तीन गंभीर जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. महामार्ग पोलिसांनी जखमींना मदत केली.
या अपघातात वर्षा आलेवार (४०) ताडसावळी, श्रीराम मोल्यावार (५०) वर्धा, प्राजक्ता अल्लीवार (१८) ताडसावळी, सविता दत्तात्रय गिरगावकर (६७) अमरावती, दत्तात्रय सदाशिव गिरगावकर (७२) अमरावती, संध्या येरावार (५०) यवतमाळ, विष्णू राठोड (२१) केळझरा, सीताराम बोर्लेवार (६०) आर्णी, शेख राजीक शेख दाऊद (३८) आर्णी, तुळसाबाई डोळे (७५) सोनखास, पुंजाबाई गणपत डोळे (७५) सोनखास, दीपक देवीदास येरावार (६४) यवतमाळ, संतोष खांडू पवार (३८) रतननाईकनगर, अभिजित लाभसेटवार (२७) यवतमाळ, विजय नारायण मुनेश्वर (६५) यवतमाळ, शोभा दीपक येरावार (५८) यवतमाळ, स्वप्नील रमेश चिंतावार (३५) आर्णी, किशोर कृष्णराव कारंजेकर (३६) वर्धा, अर्चना किशोर कारंजेकर (३८) रा. वर्धा, महिमा बी (७०) रा. वसमत, कृष्णा वासुदेव चिंतावार (२९) उदयनगर नांदेड, बस चालक अब्दूल सालेम (४९), वाहक श्रीकांत वासू मडावी आणि इंडिका मालक-चालक संजय ग्यानबा सावळे (४२) रा. नवामोंढा नांदेड यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)