नगरपरिषदांना २८ कोटींचा निधी

By Admin | Published: February 8, 2017 12:18 AM2017-02-08T00:18:07+5:302017-02-08T00:18:07+5:30

केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगातून तब्बल २७ कोटी ३८ लाख ८७ हजार ४६१ रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

28 crores fund for municipal councils | नगरपरिषदांना २८ कोटींचा निधी

नगरपरिषदांना २८ कोटींचा निधी

googlenewsNext

चौदावा आयोग : लोकसंख्येनुसार वाटा
यवतमाळ : केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगातून तब्बल २७ कोटी ३८ लाख ८७ हजार ४६१ रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. लोकसंख्येनुसार या निधीची विभागणी केली गेली आहे.
सर्वाधिक निधी यवतमाळ नगरपरिषदेला मिळाला. राज्यातील सर्वात मोठी व ‘अ’ दर्जाची नगरपालिका म्हणून यवतमाळची ओळख आहे. येथे विकास कामांसाठी नऊ कोटी ८९ लाख ८८ हजार ३४२ रूपयांचा निधी देण्यात आला. यातून शहरात नव्यावे समविष्ट भागात विकास कामे केली जाणार आहे. त्यात रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या, शौचालय निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. प्रशासकीय स्तरावर कामांचा प्राधान्य क्रम ठरवून या निधीच्या खर्चाचा आराखडा तयार केला जात आहे.
दारव्हा नगरपरिषदेला ९५ लाख १३ हजार, घाटंजी नगपरिषदेला ८९ लाख २७ हजार, दिग्रसला एक कोटी ७४ लाख, पुसदला दोन कोटी ७१ लाख, उमरखेडला दोन कोटी चार लाख, पांढरकवडाला एक कोटी १६ लाख, वणीला दोन कोटी २१ लाख, नेरला एक कोटी ३४ लाख, तर आर्णीला एक कोटी ४५ लाख प्राप्त झाले. तसेच मारेगाव नगरपंचायतीला ४२ लाख ५४ हजार, महागावला ३९ लाख ३६ हजार, कळंबला ९३ लाख ८० हजार, झरीला १६ लाख ९५ हजार, राळेगावला ७७ लाख ५७ हजार, तर बाभूळगाव नगरपंचायतीला २६ लाख ४९ हजार रुपये प्राप्त झाले. आचारसंहिता संपताच या निधीतील कामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरू होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

 

Web Title: 28 crores fund for municipal councils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.