सरकारी शाळांचे ३ लाख विद्यार्थी घटले! योजनांचा निधी सोडण्याचा पेच

By अविनाश साबापुरे | Published: July 25, 2023 05:44 AM2023-07-25T05:44:07+5:302023-07-25T05:45:33+5:30

पुणे, मुंबईत मात्र नऊ हजार विद्यार्थी वाढले

3 lakh students of government schools decreased! Embarrassment of defunding of schemes | सरकारी शाळांचे ३ लाख विद्यार्थी घटले! योजनांचा निधी सोडण्याचा पेच

सरकारी शाळांचे ३ लाख विद्यार्थी घटले! योजनांचा निधी सोडण्याचा पेच

googlenewsNext

अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ :
कोरोना संकटानंतर अनेक विद्यार्थ्यांनी शाळा बदलल्या. त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांवर झाला. गेल्या वर्षभरात या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून तब्बल ३ लाख ७६८ विद्यार्थी घटल्याची गंभीर बाब यू-डायसच्या ताज्या अहवालातून पुढे आली आहे. 

केंद्र शासनाने यंदाही सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंदणी यू-डायस प्लस प्रणालीवर करून घेतली आहे. त्यानुसार, २०२२-२३ या सत्रात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून ५१ लाख २३ हजार ९५५ विद्यार्थी दाखल होते. शासनाने या आकडेवारीची तुलना २०२१-२२ मधील माहितीशी केली असता, वर्षभरात तब्बल तीन लाखांवर विद्यार्थ्यांची घट दिसून आली आहे.  

दुसरीकडे, मुंबई उपनगरमध्ये १४ हजार ८७१, पुणे जिल्ह्यात ९ हजार ३२९ विद्यार्थी सरकारी शाळेत वाढलेले आहेत.  नागपूर, चंद्रपूर, नांदेड, नाशिक, मुंबई, रायगड, पुणे, सोलापूर, सांगली या महापालिका शाळांमध्ये २१ हजार ७३८ विद्यार्थी वाढले आहेत.

खात्री करा, विद्यार्थी शोधा! 

यू-डायसमध्ये तीन लाख विद्यार्थी कमी दिसत असल्याने समग्र शिक्षाचा चालू वर्षातील निधी नेमका कसा खर्च करावा, हा पेच निर्माण होणार आहे. गणवेश, पुस्तके व इतर विद्यार्थी लाभाच्या निधीवर या घटीचा परिणाम होणार आहे. त्यामुळेच परिषदेने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना अलर्ट करणारे पत्र रवाना केले आहे. शाळानिहाय विद्यार्थी संख्येची खात्री करा. राहिलेले विद्यार्थी शोधा. राहिलेल्यांची माहिती यू-डायसमध्ये तातडीने भरा, असे निर्देश पत्रात आहेत.

जाणकारांच्या मते...

शाळांनी या तीन लाख विद्यार्थ्यांची माहिती यू-डायसवर भरली किंवा नाही, असा प्रश्न आहे. शिवाय, या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नसल्याने ते प्रणालीत नोंदविले गेले नाहीत का, असाही प्रश्न आहे. परंतु, शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, कोरोना काळात शाळा बंद असताना अनेक शाळांनी बोगस विद्यार्थ्यांची माहिती भरली.    

जिल्हानिहाय विद्यार्थ्यांची घट 

जिल्हा      २०२२     २०२३ 
नंदुरबार     १,०३,२६३     ९८,१८८
धुळे     १,००,०६४     ९०,९३१
जळगाव     २,०२,२२२      १,८९,८५३
बुलढाणा     १,८५,६५३     १,७३,७७२
अकोला     ८६,१२९     ७८,२८१
वाशिम     ७९,२९२     ७१,८५७
अमरावती     १,४४,२८२     १३७,५२५
वर्धा     ५४,६९१     ५२,५३६
नागपूर     १,०५,३२४     १,०१,९५१
भंडारा     ७७,०७०     ७५३९३ 
गोंदिया     ८९४४१     ८६५१३ 
गडचिरोली     ७२९९७     ७१३८५ 
चंद्रपूर     १,०९,३२५     १,०३,९४१
यवतमाळ     १,९४,६६३     १,७७,८३५
नांदेड     २,२३,६३५     १,९८,४५५
हिंगोली     १,०२,९२१     ९२,५७७
परभणी     १,३२,७८६    १,१८,८८०

जिल्हा      २०२२     २०२३ 
जालना     १,६३,६२५     १,४६,०६१
छ.संभाजीनगर २,४२,६८४ २,१७, ३९८ 
नाशिक     ३,२७,५१०     ३,१४,५०६
ठाणे     २,०२,४८८     १,९५,५३३
मुंबई उपनगर २,९२,८२५     ३,०७,६९६
रायगड     १,०४,०३७     १,००,४१८
पुणे     ३,८४,२२०     ३,९३,५४९
अहमदनगर     २,३४,२३३     २,२३,७४२
बीड     १,८१,२५२     १,६०,२०५
लातूर     १,२५,०४५     १,०७,४१४
धाराशिव     १,१६,२१३     १,०६,८२५
सोलापूर     २,२५,९५३     २,१०,७०९
सातारा     १,४०,१८२     १,३१,१३२
रत्नागिरी     ७५,१६९     ७०,५३९
सिंधुदुर्ग     ३६,७५७     ३४,९९७
कोल्हापूर     १,९७,५३८     १,८५,४४३
सांगली     १,३२,२२७     १,२६,०४९
पालघर     १,७९,००७     १,७१,८६६

Web Title: 3 lakh students of government schools decreased! Embarrassment of defunding of schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.