बोगस बियाण्यांच्या ३० हजारांवर तक्रारी; पूर्ण नुकसानभरपाई कठीण, दादा भुसे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 05:53 AM2020-07-06T05:53:10+5:302020-07-06T05:55:05+5:30
राज्यात जवळपास ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीजसह काही खासगी कंपन्यांचेही बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. या तक्रारींचा निपटारा केला जात आहे.
यवतमाळ : कापूस आणि सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे नुकसान झाल्याच्या ३० हजारांवर शेतकऱ्यांनी राज्यभरातून तक्रारी केल्या आहे. या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी यवतमाळात सांगितले.
राज्यात जवळपास ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीजसह काही खासगी कंपन्यांचेही बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. या तक्रारींचा निपटारा केला जात आहे. महाबीजकडून पर्यायी बियाणे देण्यात येत आहे. त्यांच्याकडे दहा हजार क्विंटल अतिरिक्त बियाण्यांचे नियोजन होते. त्यातूनच हे बियाणे दिले जात आहे. शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावे, असे सांगण्यात आले होते.
प्रत्येक गावात कृषी सहायकाच्या माध्यमातून घरगुती बियाण्यांची उत्पादन क्षमता निश्चित करण्याचे प्रयोग राबविण्यात आले. यामुळे बºयाच शेतकºयांनी घरच्याच दर्जेदार बियाण्यांचा वापर केला. त्यामुळे बोगस बियाण्यांमुळे होणाºया नुकसानीचे प्रमाण बºयाच अंशी कमी करता आले आहे. आता ज्या कंपन्यांकडून अशा बियाण्यांचा पुरवठा झाला, त्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. ही कारवाई करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकाºयाचे अधिकार तालुका कृषी अधिकाºयांना देण्यात आले. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून पुढील कारवाई केली जात आहे. जो दोषी असेल त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यातून कुणीही सुटणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.