३२ बंधाऱ्याचे खोलीकरण
By admin | Published: April 23, 2017 02:38 AM2017-04-23T02:38:50+5:302017-04-23T02:38:50+5:30
मारेगाव तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ३२ नाला बंधाऱ्याच्या खोलिकरणाचे काम धुमधडाक्यात सुरू आहे.
बोटोणी : मारेगाव तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ३२ नाला बंधाऱ्याच्या खोलिकरणाचे काम धुमधडाक्यात सुरू आहे.
तालुका कृषी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शेतकऱ्यांची सिंचनाद्वारे उत्पन्नात वाढ व्हावी व आर्थिक उन्नती होऊन आत्महत्या थांबाव्या, या उद्देशाने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत खैरगाव व गवराळा येथे नाला बंधाऱ्याचे खोलिकरणाचे काम सुरू आहे. तालुक्यात ३२ नाला बंधाऱ्याचे दोन लाख १० हजार रूपये किंमतीचे १०० टक्के अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करण्यात येत आहे. हा नाला बंधारा २० मीटर लांब, तर तीन मीटर खोल असून खैरगाव येथे चार नाला बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास येत आहे. या बंधाऱ्याला उन्हाळ्यातही सात, आठ फूट पाणी लागले असून डोंगरमाथ्याचे वाहून जाणारे पाणी अडणार आहे. या योजनेचा शेतकरी आपल्या शेतात सिंचन करून उत्पन्न वाढविण्यास फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे तालुका कृषी अधिकारी आर.आर.दासरवार, मंडळ कृषी अधिकारी डी.बी.ठाकरे यांनी आवाहन केले आहे. याकरिता कृषी सहाय्यक परीश्रम घेत आहे. (वार्ताहर)