कानेडात शस्त्राच्या धाकावर 32 लाखांची तार पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2022 11:05 PM2022-11-09T23:05:07+5:302022-11-09T23:06:15+5:30

८ नोव्हेंबरच्या रात्री हा थरार घडला. मारेगाव तालुक्यातील कानेडा येथे महाराष्ट्र-तेलंगणा टॉवर लाईनचे साहित्य ठेवून आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ९ ते १० जणांचे एक टोळके कानेडा येथे दोन ट्रक घेऊन गेले. हे ट्रक घटनास्थळापासून लांब उभे करण्यात आले होते. अगोदर दोन चोरटे घटनास्थळी गेले. त्या ठिकाणी असलेल्या दोन पहारेकऱ्यांपैकी एकाला चाकू लावला, तर दुसऱ्याला पेचकच लावून आरडाओरड केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

32 lakh wire was stolen at gunpoint in Canada | कानेडात शस्त्राच्या धाकावर 32 लाखांची तार पळविली

कानेडात शस्त्राच्या धाकावर 32 लाखांची तार पळविली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : तालुक्यात सुरू असलेल्या टॉवर लाईनच्या कामावरील पहारेकऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटारूंच्या टोळीने रोख रकमेसह ३२ लाख रुपये किमतीची तार लंपास केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री तालुक्यातील कानेडा परिसरात घडली. विशेष म्हणजे तार चोरीसाठी ट्रक आणि क्रेनचा वापर करण्यात आला. लुटारूंची संख्या १० होती. याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
८ नोव्हेंबरच्या रात्री हा थरार घडला. मारेगाव तालुक्यातील कानेडा येथे महाराष्ट्र-तेलंगणा टॉवर लाईनचे साहित्य ठेवून आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ९ ते १० जणांचे एक टोळके कानेडा येथे दोन ट्रक घेऊन गेले. हे ट्रक घटनास्थळापासून लांब उभे करण्यात आले होते. अगोदर दोन चोरटे घटनास्थळी गेले. त्या ठिकाणी असलेल्या दोन पहारेकऱ्यांपैकी एकाला चाकू लावला, तर दुसऱ्याला पेचकच लावून आरडाओरड केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या जवळील दोन हजार रुपये हिसकावून घेतले. पहारेकरी दहशतीत आल्याचे लक्षात येताच, लांब उभ्या असलेल्या सहकाऱ्यांना फोन करून दोन्ही ट्रक घटनास्थळी बोलावून घेतले. घटनास्थळी उभ्या असलेल्या क्रेन मशीनच्या साह्याने या लुटारूंनी टॉवर तारांचे आठ बंडल ट्रकमध्ये टाकले. ९ वा बंडल क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये टाकत असतानाच क्रेनचा केबल तुटला.  त्यामुळे लुटारूंनी पहारेकऱ्यांचे हातपाय बांधून चोरटे घटना स्थळावरून वाहनासह पळून गेले. क्रेन तुटल्याने घटनास्थळी असलेले ११ बंडल तार वाचले. ताराच्या एका बंडलची किंमत चार लाख रुपये आहे. लुटारूंनी ३२ लाखांचे ८ बंडल लंपास केले. पहारेकरी सरीम आलम बाबर अली रा. कुमरगंज, बंगाल. (हल्ली मुक्काम कानेडा) यांनी सकाळी आठ वाजता पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलिसांनी अज्ञात ९ ते १० लुटारूंच्या विरोधात भादंवी ३९५, ३९७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी करीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात चारचाकी वाहनातून येत चोरी करण्याच्या घटना घडत आहे. 

 

Web Title: 32 lakh wire was stolen at gunpoint in Canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.