पुसदची बस उलटून ३३ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 10:01 PM2017-12-16T22:01:55+5:302017-12-16T22:02:07+5:30

पुसद आगाराच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने झालेल्या अपघातात ३३ प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तालुक्यातील रोहडा ते मारवाडी मार्गावर घडली.

33 passengers injured in Pusala bus accident | पुसदची बस उलटून ३३ प्रवासी जखमी

पुसदची बस उलटून ३३ प्रवासी जखमी

Next
ठळक मुद्देपुसद आगाराच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने झालेल्या अपघातात ३३ प्रवासी जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : पुसद आगाराच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने झालेल्या अपघातात ३३ प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तालुक्यातील रोहडा ते मारवाडी मार्गावर घडली.
पुसद आगाराची हिंगोली-पुसद बस (क्रं.एम.एच. १४/बीटी ०९०२) बेलोरा-रोहडा-मारवाडीमार्गे पुसदकडे येत होती. रोहडा-मारवाडी मार्गावर रस्त्यातील खड्यामुळे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटली. बसमधील ५७ प्रवाशांपैकी ३३ प्रवासी जखमी झाले.
स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने पुसदच्या एसटीला अपघात
 हिंगोली-पुसद बसला रोहडा-मारवाडीदरम्यान अपघात झाल्याने चालक-वाहकासह ३३ प्रवासी जखमी झाले.
जखमींमध्ये चालक संदीप चव्हाण, वाहक गजानन व्हटगीरे यांच्यासह रजनिकांत धवसे (३०) रा.पातोंडा जि. हिंगोली, प्रकाश ढाले (३५) रा. बासंबा जि. हिंगोली, शेख शहाजहानबी (४०), प्रभाकर वान्हाळे (४९), सिंधु वान्हाळे (३८), शेख मुसा शेख हुसेन (४९), बलवंत झुंझारे सर्व रा. बेलोरा ता. पुसद, काळूबाई राठोड (७०) रा. फेट्रा, सुभाष पोले (४०) रा. जवळा, रामजी वाघमारे (६५), रेणूका वाघमारे दोघेही रा. पारडा जि.हिंगोली, आनंदराव ढाले (६०) रा. पुसद, गोदावरी ढोले (५३) रा. रोहडा, सुभाष मस्के (६०) रा. जामनाईक, शेख परवेज शेख मेहबूब (२५)बराम मारवाडी, प्रकाश ढाले (३५) रा. बासंबा, सोनू चव्हाण (१८) रा. भटसावंगी, अमिनाबी सैयद मुसा (४०) रा. अनसिंग, उमेश जाधव (२८), अंकुश चव्हाण (२५) दोघेही रा. मोहता, गोदावरी राठोड (३५) रा. भटसावंगी, स्वरांजली मस्के (३०) रा. जामनाईक, निर्मला मस्के (६०), गंगाधर मस्के (६५) दोघेही रा. बासंबा, संगिता तडसे (३०), श्रीकांत तडसे दोघेही रा. रोहडा, आदित्या पातोडे (११), कांचन पातोडे (३५) दोघेही रा. पांढुर्णा, उजमाबी शेख मेहबूब (१५) रा. दिग्रस, शेख परवेश शेख मेहबूब (१५), रा. मारवाडी यांचा समावेश आहे. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. जय नाईक, डॉ. उमेश मडावी व चमूने उपचार केले. आमदार मनोहरराव नाईक, भाजपा नेते अ‍ॅड.नीलय नाईक, तहसीलदार डॉ.संजय गरकल, देवानंद ढबाले, साहेबराव ढबाले, विश्वास भवरे, भारत पाटील आदींनी रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली.
खड्ड्यांमुळे अपघात
रोहडा ते मारवाडी मार्गावरील पूलाजवळ मोठा खड्डा आहे. त्यात बस अडकल्याने स्टेअरिंगचा रॉड तुटला. त्यामुळे अपघात घडल्याचे चालक संदीप चव्हाण व प्रवासी कैलास सोडगीर यांनी सांगितले.

Web Title: 33 passengers injured in Pusala bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.