यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून ३६ शेतकऱ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 07:00 AM2020-09-05T07:00:00+5:302020-09-05T07:00:07+5:30

यावर्षी पुन्हा ३६ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाली आहे. त्यामुळे पुन्हा मृत्यूचा धोका वाढला आहे.

36 farmers poisoned by spraying pesticides in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून ३६ शेतकऱ्यांना विषबाधा

यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून ३६ शेतकऱ्यांना विषबाधा

Next
ठळक मुद्दे जनजागृतीवर प्रश्नचिन्ह, सुरक्षा किटची प्रतीक्षाचपुन्हा मृत्यूचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दोन-तीन वर्षांपूर्वी पिकांवर कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन ८८६ शेतकऱ्यांना उपचारार्थ दाखल करावे लागले होते. तर २२ शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. त्यानंतर कृषी विभागाने फवारणी कशी करावी यावर जनजागृती सुरू केली. मात्र या जनजागृतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. कारण यावर्षी पुन्हा ३६ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाली आहे. त्यामुळे पुन्हा मृत्यूचा धोका वाढला आहे.
कीटकनाशक फवारणीतून विषबाधा व मृत्यू झाल्यानंतर राज्यभर खळबळ निर्माण झाली होती. आधीच कर्ज व नापिकीपायी शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. त्यात कीटकनाशक फवारणीने शेतकऱ्यांपुढे आणखी संकट निर्माण झाल्याने राज्य सरकार व प्रशासनाचा संपूर्ण फोकस यवतमाळवर निर्माण झाला होता. त्यातूनच कृषी विभागाला शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीची जबाबदारी दिली गेली. तर कृषी क्षेत्रातील कंपन्यांना शेतकऱ्यांना सुरक्षा किट पुरविण्यास सांगण्यात आले होते.

पहिली दोन वर्ष कंपन्यांनी सुरक्षा किट बऱ्यापैकी वाटपही केले. मात्र लाखो शेतकरी आणि किट हजारात अशी तफावत त्यात निर्माण झाली. आता तर कृषी विभागाची जनजागृती आणि किट वाटपही चांगलेच थंडावले. त्यामुळेच की काय ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीतून विषबाधा पुन्हा सुरू झाली आहे. आतापर्यंत ३६ शेतकऱ्यांना ही बाधा झाल्याची नोंद वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दप्तरी नोंद आहे. त्यातील १३ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहे.
कृषी विभाग व कंपन्या शेतकरी, शेतमजुरांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवतात. शेतकरी पुरेशी काळजी घेत नाही, तोंडाला रुमाल बांधत नाही, फवारणीच्याच हाताने तंबाखू घोटतात, उघड्या अंगाने फवारणी करतात आदी शेतकऱ्यांचे दोष दाखविले जातात. परंतु प्रत्यक्षात त्यात वास्तव नाही. पीक लहान असताना शेतकरी व्यवस्थित फवारणी करतो.

परंतु आता कपाशीची उंची माणसापेक्षाही वाढली आहे. अशा स्थितीत कीटकनाशक फवारणी करताना हात वर न्यावा लागतो व त्यातूनच फवारा चेहऱ्यावर उडतो. उंची वाढलेल्या पिकांवर फवारणी करताना नेमकी सुरक्षा किटची अधिक आवश्यकता असते. मात्र शेतकऱ्यांकडे या किट पुरेशा प्रमाणात पोहोचल्याच नसल्याची माहिती आहे. त्यातूनच विषबाधा प्रकरणे वाढत आहे. कृषी विभागाने आत्ताच याची दखल घेऊन जनजागृती व किट वाटप न केल्यास लगतच्या भविष्यात विषबाधीत शेतकरी-शेतमजुरांची संख्या आणखी वाढण्याची व त्यातून मृत्यूचे संकट उभे राहण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

सिम्बॉलची माहितीच नाही
अनेक प्रकारचे औषधी एकत्र केल्यानंतर त्याचे जहाल औषधी तयार होते. मात्र प्रत्येक औषधांची स्वतंत्र फवारणी करणे शक्य नसल्याने शेतकरी अशा पध्दतीने फवारणी करतात. कुठले औषध किती घातक याचे प्रमाण दर्शविणारे सिम्बॉल औषधांवर असतात. यात रेड ठिपका अतिघातक स्वरूपाचे औैषध म्हणून वापरला जातो. पिवळ्या रंगाचा ठिपका त्यापेक्षा कमी घातक तर ग्रीन ठिपका सर्वाधिक सुरक्षित औषधांसाठी वापरला जातो. ज्या शेतकºयांना इंग्रजी वाचता येत नाही अशा शेतकऱ्यांना हा सिम्बॉल घातकता दर्शवितो. मात्र याची माहिती अजूनही कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना दिली जात नाही. यामुळे शेतकरी फवारणी करताना बिनधास्त असतात.

Web Title: 36 farmers poisoned by spraying pesticides in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी