‘जेडीआयईटी’चे ३६ विद्यार्थी नामांकित कंपनीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:55 PM2018-11-14T23:55:38+5:302018-11-14T23:56:23+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३६ विद्यार्थ्यांची इंदोर येथील रिसर्च इन इन्व्हेस्टमेंट अॅडवायझर या कंपनीत निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३६ विद्यार्थ्यांची इंदोर येथील रिसर्च इन इन्व्हेस्टमेंट अॅडवायझर या कंपनीत निवड झाली आहे.
सदर कंपनी जागतिक स्तरावरील शहर बाजार व कमोडिटी मार्केटमध्ये संशोधन करणारी आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई), नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई), मल्टी कॅमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स), नॅशनल कमोडिटी अँड डेरीव्हेटीव्ह एक्सचेंज (एनसीडीईएक्स) ज्यामध्ये इक्विटी, डेरेव्हेटीव्ह, फ्यूचर अँड आॅप्शन्स, फॉरेन एक्सचेंज, कॅश, बॉण्ड्स अँड डिबेंचर्स, धातू, कृषी, आॅईल अँड गॅस संबंधित वस्तूंचे ट्रेडींग व तत्सम सेवा ही कंपनी पुरविते.
या नामांकित कंपनीतर्फे ‘जेडीआयईटी’मध्ये इन कॅम्पस ड्राईव्ह घेण्यात आला. यात अंतिम वर्षाच्या सर्व शाखेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रुप डिस्कशन राऊंड, टेक्नीकल इंटरव्ह्यू व एचआर इंटरव्ह्यूच्या फेऱ्या घेण्यात आल्या. यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील धमादीप ब्राह्मणे, प्राची गोकमारे, सायली मेश्राम, श्रद्धा तोडसाम, अनिकेत डेकाटे, तृप्ती गलाट, अंकुश वडतकर, वैभव जयस्वाल, शेख इफरत शेख इकबाल, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेतून पूजा दावडा, तेजश्री बावरे, निधी डांगे, मृदुला देव, युगंधरा गुल्हाने, भक्ती व्यास, पल्लवी सबल, चाँदणी सिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतून अनुजा मिस्कीन, स्वप्नीत ओबेराय, स्वाती तोंडवाल, अजिंक्य कल्याणकर, मानस मित्रा, प्रसाद निलजकर, शुभम गोडे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग शाखेतून श्यामली कडुकार, शुभम उघडे, श्रद्धा तंबाखे, शामल धांबे, कविश मोरे, दामिनी पुट्टेवार, पूजा घाणे, सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतून सिमांशू पांडे, अंकित पिंजरकर, श्रृती येरकर, केमिकल इंजिनिअरिंग शाखेतून नेहा मुत्तेलवार, साहिल पखाले या विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यांना कंपनीतर्फे वार्षिक तीन लाख रुपयांचे पॅकेज घोषित करण्यात आले. कंपनीतर्फे एचआर मॅनेजर साक्षी धाडकर व एचआर एक्झीक्युटीव्ह प्रतिभा लहेरी यांनी निवड प्र्रक्रियेचे कामकाज सांभाळले.