आरटीओमधील ३७ अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 05:38 AM2018-09-22T05:38:45+5:302018-09-22T05:38:48+5:30
वाहनांची काटेकोर तपासणी न करता योग्यता प्रमाणपत्र जारी करणाऱ्या आरटीओतील ३७ वाहन निरीक्षक व सहायक निरीक्षकांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे.
- राजेश निस्ताने
यवतमाळ : वाहनांची काटेकोर तपासणी न करता योग्यता प्रमाणपत्र जारी करणाऱ्या आरटीओतील ३७ वाहन निरीक्षक व सहायक निरीक्षकांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, पनवेल व ठाणे येथील आरटीओ कार्यालयांमध्ये हे अधिकारी कार्यरत होते.
या निलंबितांमध्ये २८ मोटर वाहन निरीक्षक व नऊ सहायक मोटर वाहन निरीक्षकांचा समावेश आहे. निलंबित मोटर वाहन निरीक्षक - योगिता अत्तरदे, हरीशकुमार पवार, किशोर पवार, शंकर कराळे, सुनील क्षीरसागर, मयूर भोसेकर, ए.व्ही. गवारे, विजयसिंह भोसले, समीर सय्यद, प्रदीप बराटे, रंगनाथ बंडगर, राजेंद्र केसकर, जकी उद्दीन बिरादार, अरविंद फुलारी, संदीप म्हेत्रे, राहूल नलावडे, अनिस अहमद सरदार बागवान, विजय सावंत, संभाजीराव होलमुखे, ललित देशले, सुनील मेत्रे, सुरेश आवाड, समीर शिरोडकर, रवींद्र सोलंके, सुनील राजमाने, अश्विनी जाधव, संतोष गांगरडे व दत्तात्रय गाडवे. निलंबित सहायक मोटर वाहन निरीक्षक - राजकुमार मोरमारे, नितीन पारखे, त्रिवेणी गालिंदे, सावंत पाटील, ज्योतीलाल शेटे, प्रदीप ननवरे, रमेश पाटील, रवींद्र राठोड व यु.जे. देसाई.
निलंबित बहुतांश अधिकारी औरंगाबाद, पुणे, पनवेल, कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत कार्यरत आहेत.
>न्यायालयाचा आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देताना नियमानुसार काटेकोर तपासणी करण्याचे आदेश परिवहन खात्याला दिले होते. मात्र, त्यानंतरही पाच आरटीओ व एका डेप्युटी आरटीओ कार्यालयांतर्गत काटेकोर तपासणी न करता योग्यता प्रमाणपत्र जारी केले.