विवाहितांच्या छळाचे वर्षभरात ३८१ गुन्हे

By admin | Published: July 5, 2014 01:33 AM2014-07-05T01:33:49+5:302014-07-05T01:33:49+5:30

जिल्ह्यात विवाहितांच्या छळाच्या वर्षाकाठी सुमारे ४०० गुन्हे दाखल होतात.

381 offenses under Marriage Persons | विवाहितांच्या छळाचे वर्षभरात ३८१ गुन्हे

विवाहितांच्या छळाचे वर्षभरात ३८१ गुन्हे

Next

यवतमाळ : जिल्ह्यात विवाहितांच्या छळाच्या वर्षाकाठी सुमारे ४०० गुन्हे दाखल होतात. विवाहितेने तक्रारीत नोंदविलेल्या व्यक्तींना आरोपी बनविले जाते. परंतु कौटुंबिक कलहाच्या अशा प्रकरणांमध्ये शिक्षेचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळेच खटल्याच्या निकालानंतर महिलांकडून ४९८ (अ) या कलमाचा गैरवापर होत असल्याचा सूर जिल्ह्यात ऐकायला मिळतो.
हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावर तीव्र चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने चौकशीशिवाय सासरच्यांना अटक करू नका, असे निर्देश पोलिसांना दिले आहे. यानिमित्ताने गावागावात आणि पोलीस दलातसुद्धा महिलांकडून अनेक प्रकरणात ४९८ (अ) (पती व सासरच्या मंडळीकडून शारीरिक व मानसिक छळ) या कलमाचा गैरवापर केला जात असल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. यानिमित्ताने अशा प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला असता धक्कादायक वास्तव पुढे आले. येथे वर्षभरात छळाचे सुमारे ४०० गुन्हे दाखल होत असल्याचे आढळून आले. जिल्हा पोलीस दलातर्फे उघडण्यात आलेल्या महिला सुरक्षा व समूपदेशन विशेष कक्षामुळे हा आकडा अर्ध्यावर आल्याचे सांगितले जाते.
कोणतीही महिला कौेटुंबिक छळाची तक्रार पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यास तिला प्रथम पोलिसांच्या समूपदेशन केंद्रात पाठविले जाते. तेथे दोनही कडील संबंधित व्यक्तींना बोलावून त्यांचा संसार तुटू नये या दृष्टीने मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यातील मतभेद, गैरसमज मिटविण्याचा प्रयत्न केला जातो.
त्यानंतरही त्यांच्यात तडजोड होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसेल तर अखेर नाईलाज म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी प्रकरण संबंधित पोलीस ठाण्याला पाठविले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 381 offenses under Marriage Persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.