CoronaVirus : यवतमाळमध्ये गेल्या 24 तासांत 382 जण पॉझिटिव्ह, सहा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 07:17 PM2021-03-11T19:17:32+5:302021-03-11T19:18:15+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 84 वर्षीय पुरुष आणि 67 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 83 वर्षीय महिला, दारव्हा शहरातील 68 वर्षीय आणि दारव्हा तालुक्यातील 62 वर्षीय महिला आहे. (Yavatmal)
यवतमाळ: जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 382 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 222 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. (382 New CoronaVirus positive patients found in yavatmal and six deaths in last 24 hours)
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 84 वर्षीय पुरुष आणि 67 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 83 वर्षीय महिला, दारव्हा शहरातील 68 वर्षीय आणि दारव्हा तालुक्यातील 62 वर्षीय महिला आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या 382 जणांमध्ये 229 पुरुष आणि 153 महिला आहेत. यात पुसद येथील 106, यवतमाळातील 84, दिग्रस 54, बाभूळगाव 32, महागाव 27, दारव्हा 26, नेर 11, पांढरकवडा 10, कळंब 9, उमरखेड 9, वणी 5, राळेगाव 4, आर्णि 3, मारेगाव 1 आणि झरीतील 1 रुग्ण आहेत.
गुरुवारी एकूण 1791 रिपोर्ट प्राप्त झाले. यांपैकी 382 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 1409 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2226 पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 20554 झाली आहे. 24 तासांत 222 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 17833 आहे. तर जिल्ह्यात एकूण 495 मृत्यूची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 178619 नमुने पाठविले असून यांपैकी 176983 प्राप्त तर 1636 अप्राप्त आहेत. तसेच 156429 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने सांगितले आहे.