कत्तलीसाठी नेताना २१ बैलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 09:56 PM2019-07-25T21:56:42+5:302019-07-25T21:57:03+5:30

मध्य प्रदेशातून नागपूरमार्गे हैद्राबादला गोवंश कत्तलीसाठी नेले जातात. यात मोठे रॅकेट गुंतलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातून विविध मार्गाने हे गोवंश जाते. गुरुवारी वडकी पोलिसांनी रात्री १ वाजता पेट्रोलिंगदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर संशयित कन्टेनर अडविला असता त्यामध्ये ५७ बैल कोंबलेले आढळून आले.

4 bulls killed while leading to slaughter | कत्तलीसाठी नेताना २१ बैलांचा मृत्यू

कत्तलीसाठी नेताना २१ बैलांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देवडकीत ब्रेक : ‘एमपी’तून हैदराबादला तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मध्य प्रदेशातून नागपूरमार्गे हैद्राबादला गोवंश कत्तलीसाठी नेले जातात. यात मोठे रॅकेट गुंतलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातून विविध मार्गाने हे गोवंश जाते. गुरुवारी वडकी पोलिसांनी रात्री १ वाजता पेट्रोलिंगदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर संशयित कन्टेनर अडविला असता त्यामध्ये ५७ बैल कोंबलेले आढळून आले. यातील २१ जनावरांचा मृत्यू झाला होता. उर्वरित जनावरांची पोलिसांनी सुटका केली. सोबतच चार आरोपींना अटक केली.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरून एच.आर. ३८/एल.२२७३ या कंटेनरमधून जनावरे कत्तलीसाठी जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून वडकी ठाणेदार प्रशांत गीते यांनी पथकासह सापळा रचून उड्डाण पुलाजवळ ट्रक ताब्यात घेतला. मोहमद राशीद मजीद शॉ (४०) रा.साहरमपूर जि.राजगड, गुलफाम बाबर पठाण (२४) रा.बहादूरनगर ता.नुक्कड, इम्रान खान रहीम खान (२२) रा.निंबूखेडा ता.इचावड, सहीमखॉ अजगरखॉ (१९) रा.कळमनुरी जि.बिदीसा यांना अटक केली. कंटेनरच्या दोन कप्प्यांमध्ये ५७ बैल क्रूर पद्धतीने कोंबण्यात आले होते. यातील २१ बैलांचा मृत्यू झाला तर ३६ बैल जिवंत होते. त्याची सुटका पोलिसांनी केली. या बैलांची बाजारभावाप्रमाणे पाच लाख ७० हजार रुपये किमत आहे व कंटेनरची किमत दहा लाख रुपये असा १५ लाख ८१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, एसडीपीओ अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रशांत गिते, जमादार अरुण भोयर, किसन सुंकूरवार, हरीष धुर्वे, मिलिंद गोफणे, विकास धडसे, घनश्याम मेसरे, प्रदीप भानारकर, उद्धव घुगे, गौरव नागलकर, जांबूळकर यांनी केली.

Web Title: 4 bulls killed while leading to slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.