पेट्रोलिंगसाठी ४१ सायकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 09:44 PM2017-10-03T21:44:26+5:302017-10-03T21:44:46+5:30
नावीन्यपूर्ण योजनेतून पोलीस विभागाला पेट्रोलिंगकरिता ४१ सायकली मिळाल्या आहेत. त्या सात ठाण्यांमध्ये वितरित होणार आहे. परिणामी आता पोलिसांची सायकल पेट्रोलिंग सुरू होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नावीन्यपूर्ण योजनेतून पोलीस विभागाला पेट्रोलिंगकरिता ४१ सायकली मिळाल्या आहेत. त्या सात ठाण्यांमध्ये वितरित होणार आहे. परिणामी आता पोलिसांची सायकल पेट्रोलिंग सुरू होण्याची शक्यता आहे.
या सायकलींसाठी जिल्हा नियोजन समितीने दोन लाख ९५ हजारांचा निधी पोलीस विभागाला दिला. रात्री पेट्रोलिंग करताना पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचे वाहन रूंद रस्त्यावर जाणे शक्य असते. मात्र अरूंद गल्लीत त्यांना वाहने नेणे अशक्य होते. या संधीचा गुन्हेगार लाभ घेऊन पसार होण्यात यशस्वी होतात. आता असे प्रकार घडू नये म्हणून गावातील चप्पा अन् चप्पा छानता यावा म्हणून पोलिसांना सायकली देण्यात येणार आहे.
जवळपास सात गेअर असलेल्या पाच सायकली स्पोर्ट प्रकारातील आहेत. यासोबतच स्पोर्टच्या ३६ साध्या सायकली आल्या आहेत. शहर ठाण्यात अशा सहा सायकली मंगळवारी दाखल झाल्या. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या चमूने मंगळवारी दुपारी रस्त्यांवरून या सायकलींचा सराव केला. शहर ठाण्यासोबतच वडगाव व काही प्रमुख तालुक्यांसह ग्रामीण भागातील मोठ्या ठाण्यांना या सायकली दिल्या जाणार आहे.
पोलिसांच्या दिमतीला ४१ सायकली आल्या. त्याचे वितरण करण्यासाठी मायक्रो प्लानिंग केले जात आहे. लवकरच काही ठाण्यामध्ये सायकली पोहोचतील.
- एम. राज कुमार,
पोलीस अधीक्षक, यवतमाळ