पुसद विभागात ४२ कोटी पीककर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 10:38 PM2018-06-28T22:38:31+5:302018-06-28T22:39:41+5:30
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक पुसद विभागीय कार्यालयच्यावतीने तीन तालुक्यातील १०७ सहकारी संस्थेतील ९ हजार ३६७ सभासदांना ४२ कोटी ४३ लाख ६४ हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक पुसद विभागीय कार्यालयच्यावतीने तीन तालुक्यातील १०७ सहकारी संस्थेतील ९ हजार ३६७ सभासदांना ४२ कोटी ४३ लाख ६४ हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा बँकेच्या पुसद विभागीय कार्यालय अंतर्गत पुसद, उमरखेड व महागाव तालुक्यांचा सामावेश आहे. पुसद तालुक्यातील ३७ सहकारी संस्था मार्फत ४ हजार २४० सभासदांना ४ हजार ९९१.६४ हेक्टेरसाठी तब्बल १९ कोटी ७ लाख ८७ हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले.
उमरखेड तालुक्यातील ५२ सहकारी संस्थेच्या ३ हजार ६६४ सभासदांना एकूण ४ हजार १८६.९५ हेक्टर क्षेत्रासाठी १६ कोटी ५४ लाख २५ हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले तर महागाव तालुक्यातील २८ सहकारी संस्थेच्या १ हजार ४६३ सभासदांना २ हजार ७.६२ हेक्टर क्षेत्रासाठी तब्बल ७ कोटी ९८ लाख ९७ हजार रुपये एवढे कर्ज वाटप करण्यात आले.
बँकेचे ज्येष्ठ संचालक विजयराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय व्यवस्थापक डी.सी. राठोड, वसुली अधिकारी एस.एम. पुलाते, पी.बी. चव्हण, निरीक्षक सूर्यवंशी, पवार व रंगारी व सर्व सचिव यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या कर्जवाटपासाठी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे इतर राष्टÑीयकृत बँक मात्र खरीप कर्ज वाटपसाठी अद्याप पुढे आल्या नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहे.