अरुणावती प्रकल्पात ४४ टक्के साठा
By admin | Published: July 29, 2016 02:27 AM2016-07-29T02:27:32+5:302016-07-29T02:27:32+5:30
जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या तालुक्यातील अरुणावती प्रकल्पात सध्या ४४ टक्के जलसाठा आहे.
दिग्रस तालुका : वार्षिक सरासरीच्या ६८ टक्के पावसाची नोंद
दिग्रस : जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या तालुक्यातील अरुणावती प्रकल्पात सध्या ४४ टक्के जलसाठा आहे. जोरदार पाऊस होऊनही प्रकल्प अर्धाही भरला नाही. आतापर्यंत तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाल आहे.
तालुक्यातील पिके डवरणीला आली आहे. पर्जन्यमान वर दिसत असले तरी सर्वत्र सारख्या प्रमाणात नाही. कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस झाला आहे. सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या ६८ टक्केपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद सरकारी दप्तरीला झालेली आहे. दिग्रस तालुक्यात आजवर ५५९ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या ६८.०२ टक्के एवढी असून अपेक्षित पर्जन्यमानाच्या १६२.७२ टक्क्याने अधिक आहे. पण तालुक्यातील ज्या दोन मोठ्या नद्या अरुणावती व धावंडा नदीवर अरुणावती धरण बांधल्या गेले आहे त्या धरणात फक्त ४४ टक्केच पातळी आहे. पर्जन्यमानाच्या दृष्टीने पाहिले असतानाही पातळी साठ टक्क्याच्या जवळपास जायला हवी होती. पण ती पातळी ४४ टक्केच्या पुढे जावू शकली नाही. त्यामुळे सरकारी दप्तरी नोंद जरी ६८.०२ टक्केपेक्षा जास्त असली तरी तालुक्यात झालेली असमान पर्जन्यमान दर्शविले आहे. त्यामुळे तालुक्यातील पिकांवर त्याचा परिणाम दिसून येईल. शिवाय पीक आणेवारीला ही प्रभावीत करणारी आहे. (शहर प्रतिनिधी)