नगरपंचायतीत 47 हजार मतदार उद्या बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 05:00 AM2021-12-20T05:00:00+5:302021-12-20T05:00:02+5:30

नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. आता शेवटची रात्र वैऱ्याची समजून प्रत्येक जण खडा पहारा देत आहे. आर्थिक उलाढालसुद्धा याच रात्री केली जाणार आहे. प्रभागात मोजकी मतदार संख्या असल्याने प्रत्येकच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. चेक मेटची पॉलिसी शेवटच्या रात्री राबविली जाणार आहे. बाभूळगाव नगरपंचायतीत पाच हजार ७० मतदार असून पुरुष मतदार २५४४ आहेत.

47,000 voters to exercise their right in Nagar Panchayat tomorrow | नगरपंचायतीत 47 हजार मतदार उद्या बजावणार हक्क

नगरपंचायतीत 47 हजार मतदार उद्या बजावणार हक्क

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपंचायतींची निवडणूक रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. सहा नगरपंचायतींमधून ८४ जागांसाठी ४३५ उमेदवार आपले नशीब अजमावीत आहे. ढाणकी नगरपंचायतीच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचार रविवारी सायंकाळीच थांबला आहे. मंगळवार, २१ डिसेंबर रोजी मतदार आपला हक्क बजावणार आहे. तब्बल ४७ हजार ६९८ मतदार आपला हक्क बजावणार आहे. 
नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. आता शेवटची रात्र वैऱ्याची समजून प्रत्येक जण खडा पहारा देत आहे. आर्थिक उलाढालसुद्धा याच रात्री केली जाणार आहे. प्रभागात मोजकी मतदार संख्या असल्याने प्रत्येकच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. चेक मेटची पॉलिसी शेवटच्या रात्री राबविली जाणार आहे. बाभूळगाव नगरपंचायतीत पाच हजार ७० मतदार असून पुरुष मतदार २५४४ आहेत. महिला मतदार २५२६ आहेत. सर्वाधिक मतदार संख्या ही कळंब नगरपंचायतीची आहे. तेथे १४ हजार २०६ एकूण मतदार आहेत. त्यात पुरुष ७०८८, महिला ७११८ आहे. दुसऱ्या क्रमांकाची मतदार संख्या राळेगाव येथे १२ हजार १२७ इतकी आहे. त्यात पुरुष ६६२५, तर ६५०२ महिला आहेत. सर्वांत कमी मतदार संख्या झरी  येथे २२६८ आहे. पुरुष १ हजार १५२ तर महिला १ हजार ११६ आहे. महागाव नगरपंचायतीमध्ये सात हजार ५२० मतदार असून पुरुष तीन हजार ९०, महिला तीन हजार ६१९, तर तृतीयपंथी एक आहे. मारेगाव येथे ६५०७ मतदार आहे. त्यात पुरुष तीन हजार २५१ तर महिला मतदार तीन हजार २५६ आहेत. प्रत्येक मतदाराचे मतदान झालेच पाहिजे यासाठी उमेदवारच धडपड करीत आहे. मतदानाची टक्केवारीही ८० च्या पुढे राहण्याचा अंदाज आहे. 

खर्च मर्यादा दीड लाखाची, शेवटची रात्र बाकी
- नगरपंचायतीच्या एका उमेदवाराला प्रचार-प्रसारावर खर्च मर्यादा केवळ दीड लाखाची आहे. अनेकांनी हे बजेट कधीच पूर्ण केले आहे. आता तर शेवटची रात्री बाकी आहे. शेवटच्या रात्रीतच पैशाचा धुराळा केला जातो. रात्रीतून बाजी पलटविण्यासाठी आर्थिक सक्षमताच दाखविली जाते. त्यामुळे दीड लाखाची खर्च मर्यादा खरोखरच पाळली जाते का, हा प्रश्न आहे.

 

Web Title: 47,000 voters to exercise their right in Nagar Panchayat tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.