पीक विम्याचा ४८ हजार शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 10:33 PM2018-07-25T22:33:15+5:302018-07-25T22:34:24+5:30

गतवर्षी जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना विविध कारणाने त्याचा लाभ मिळाला नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ४८ हजार शेतकऱ्यांचा ४२ कोटींचा विमा मिळाला आहे.

48 thousand farmers benefit from crop insurance | पीक विम्याचा ४८ हजार शेतकऱ्यांना लाभ

पीक विम्याचा ४८ हजार शेतकऱ्यांना लाभ

Next
ठळक मुद्दे४२ कोटींचा निधी वळता : जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गतवर्षी जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना विविध कारणाने त्याचा लाभ मिळाला नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ४८ हजार शेतकऱ्यांचा ४२ कोटींचा विमा मिळाला आहे.
विमा काढताना आॅनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. ही कसरत पार करून अडीच लाख शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल केले होते. यानंतर अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या संकेतस्थळावर ४८ हजार शेतकऱ्यांचा डाटा मिसमॅच झाला होता. यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचा निरंक अहवाल बँकांना सादर झाला. यामुळे शेतकरी संतापले होते. त्यांच्या महसूल मंडळातील काही शेतकऱ्यांना विमा मिळाला असताना आपण का वगळल्या गेलो याच्या तक्रारी बँकापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत करण्यात आल्या. याप्रकरणात बँकांनी सतत दोन महिने पाठपुरावा केला. यानंतरही विमा कंपनीने मदत दिली नाही. शेवटी हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा फेरअहवाल मागविला. त्यांचे दस्ताऐवज तपासून मदतीची रक्कम जाहीर केली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ४२ कोटींचा निधी विमा कंपनीने बँकांकडे वळता केला. यामुळे येत्या आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होणार आहे.
मागील चार वर्षांपासून शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाने होरपळला जात आहे. अशातच ४८ हजार शेतकरी पीक विम्यापासून तर काही शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहिले होते. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. लवकरच या लाभ पोहोचणार आहे.
दुष्काळी मदत मिळण्याचेही संकेत
२०१६ मध्ये जाहीर झालेल्या दुष्काळी स्थितीची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, अशा शेतकऱ्यांना शासनाकडून जवळपास ९१ लाखांची मदत मिळणार आहे.

Web Title: 48 thousand farmers benefit from crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.