ब्राह्मणवाडा येथे ५० जोडपी विवाहबद्ध
By admin | Published: May 21, 2017 12:28 AM2017-05-21T00:28:27+5:302017-05-21T00:28:27+5:30
नेर तालुक्यातील ब्राह्मणवाडा (प) येथे झालेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्यात ५० जोडपी विवाहबद्ध झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरसगाव (पांढरी) : नेर तालुक्यातील ब्राह्मणवाडा (प) येथे झालेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्यात ५० जोडपी विवाहबद्ध झाली. बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, सहायक आयुक्त समाजकल्याण आणि दर्पण ग्रामीण बहुद्देशीय कला व क्रीडा विकास संस्था ब्राह्मणवाडा (प) यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा घेण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सदाशिवराव गावंडे, सरपंच दिलीप खडसे, रमेश दीक्षित, उपसरपंच पवन चवाळे, पांढरीचे सरपंच प्रभाकर अघम, विक्री कर अधिकारी मंगेश सगने, संतोष कोल्हे, नीलेश ठाकरे, प्रशांत भाकरे, अशोक ठाकरे, प्रवीण मकेसर, रामकृष्ण मिरगे आदी उपस्थित होते.
मेळाव्यात सहभागी जोडप्यांना कपडे, संसारोपयोगी भांडी, वधूला सोन्याचे मंगळसूत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन प्रा.अश्विनकुमार क्षीरसागर यांनी तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र मोहोड यांनी केले. आभार जगदीश शेळके यांनी मानले.
विवाह मेळाव्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष आशीष ढळे, ललित खडसे, भीमराव खडसे, रवींद्र बाजड, सचिन मोहोड, धम्मदीप खडसे, विष्णू लिंगे, अनिल ठाकरे, बाबू गोळे, मनोज ठोंबरे, प्रशांत ढळे, दिनेश कळंबे, मुकेश कणसे, सचिन सोनोने, अमोल खडसे, निखिल गोळे, गोलू राऊत, प्रवीण सहारे, नारायण इंगोले, हर्षानंद खडसे, मोंटी मकेसर आदींनी पुढाकार घेतला.