जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:36 PM2018-09-26T23:36:51+5:302018-09-26T23:37:07+5:30

जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकरिता ५० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. यामध्ये सहस्त्रकुंड, टिपेश्वर, ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा समावेश आहे. या ठिकाणावरील कामांसाठी आतापर्यंत नऊ कोटी रुपये वळते करण्यात आले आहे.

50 crore for tourism development in the district | जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ५० कोटी

जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ५० कोटी

Next
ठळक मुद्देसहस्रकुंड, टिपेश्वर : प्रशासकीय मंजुरीने चेहरामोहरा बदलणार

यवतमाळ : जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकरिता ५० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. यामध्ये सहस्त्रकुंड, टिपेश्वर, ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा समावेश आहे. या ठिकाणावरील कामांसाठी आतापर्यंत नऊ कोटी रुपये वळते करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्हा विपूल वनसंपदेने नटला आहे. यासोबतच नैसर्गिकरीत्या निर्माण झालेले धबधबे, पौराणिक वास्तूशिल्प अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या भागाचा विकास करून पर्यटन समृध्दीसाठी राज्याच्या पर्यटन विभागाने जिल्ह्यासाठी ५० कोटी रुपयांच्या शासकीय कामाला मंजूरी दिली आहे. पर्यटन स्थळाच्या विकासाने या भागाचा सर्वदृष्टीने विकास होण्यास मदत होणार आहे.
उमरखेड तालुक्यातील सहस्रकुंड धबधब्याच्या पर्यटन विकासाकरिता चार कोटी ५१ लाख ८२ हजार मंजूर करण्यात आले आहे. यातील ५० लखांचा निधी कामाकरिता वळता करण्यात आला आहे. यातून काही कामेही या भागामध्ये झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वाईल्डलाईफच्या दृष्टीने टिपेश्वर अभयारण्य महत्वाचे आहे. या ठिकाणी वाघासह अनेक वन्यप्राणी पहायला मिळातात. यामुळे या ठिकाणाकडे पर्यटकांचा लोंढा आहे. या भागाच्या विकासाकरिता चार कोटी ७७ लाख रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे.
यवतमाळ शहरातील संकटमोचन तलावाच्या विकासाकरिता चार कोटी ४९ लाख ३६ हजार रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. कळंब शहरात विकास कामे, दत्तापूर, बेंबळा प्रकल्पाचा पर्यटन विकास, ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रातील खटेश्वर सस्थानचा तलाव आणि परिसराचा विकास आणि सौंदर्यीकरण, पाथ्रटदेवी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे, आर्णी तालुक्यातील म्हसोला गावातील कान्होबा संस्थान, आर्णी तालुक्यातील पिंपळनेरचे आप्पास्वामी देवस्थान, उमरखेड येथील अंबोना तलाव, आंबाळी येथील दत्तात्रय देवस्थान या ठिकाणच्या विकास कामाकरिता ५० कोटी रुपयांच्या प्रशासकीय कामांना मंजूरी मिळाली आहे.

Web Title: 50 crore for tourism development in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.