५१ फ्लेमिंगोंचा सायखेड्यात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 09:07 PM2019-04-23T21:07:17+5:302019-04-23T21:07:49+5:30

अत्यंत देखणा फ्लेमिंगो पक्षी भारतात सहसा आढळत नाही. तो पाहता यावा म्हणून मुंबई, ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात चार-दोन फ्लेमिंगो आणण्यात आले. त्यावर राजकारणही तापले. पण यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा धरणावर सध्या ५१ फ्लेमिंगोंचा थवा मुक्कामी आलाय.

51 Fleming's stay in the sidewalk | ५१ फ्लेमिंगोंचा सायखेड्यात मुक्काम

५१ फ्लेमिंगोंचा सायखेड्यात मुक्काम

Next
ठळक मुद्देजिल्ह्याला अप्रूप : ‘फ्लेमिंगो टुरिझम’मधून स्थानिकांना मिळाला रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अत्यंत देखणा फ्लेमिंगो पक्षी भारतात सहसा आढळत नाही. तो पाहता यावा म्हणून मुंबई, ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात चार-दोन फ्लेमिंगो आणण्यात आले. त्यावर राजकारणही तापले. पण यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा धरणावर सध्या ५१ फ्लेमिंगोंचा थवा मुक्कामी आलाय. विशेष म्हणजे, या पक्ष्यांमुळे स्थानिकांना चांगला रोजगारही मिळतोय.
पांढरकवडा येथील मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमझान विराणी यांनी मंगळवारी सकाळी हे ५१ फ्लेमिंगो कॅमेराबद्ध करून त्यांची नोंद घेतली आहे. जिल्ह्यातच नव्हेतर महाराष्ट्रात कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येणे दुर्मिळ आहे. काही ठिकाणी हे स्थलांतरित पक्षी दिसले तरी ते फार तर एखाद दोन दिवस थांबतात. मात्र, सायखेडा धरण परिसरात ते दरवर्षी एप्रिलच्या सुमारास येऊन एक ते दीड महिना मुक्काम ठोकतात, अशी माहिती डॉ. विराणी यांनी दिली.
२०१५ मध्ये या परिसरात १३ तर २०१६ मध्ये ३२ फ्लेमिंगोंची नोंद विराणी यांनी घेतली होती. मध्यंतरीच्या काळात हे पक्षी आले नाही. तर आता २०१९ च्या एप्रिलमध्ये मात्र ५१ इतक्या विक्रमी संख्येत येऊन फ्लेमिंगोंनी आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. या फ्लेमिंगोची स्थानिक रहिवासीही व्यवस्थित काळजी घेतात. शिवाय, धरण परिसरात गुरे चारणारे, मासेमारी करणारे यांच्याकडून या पक्ष्यांना त्रास होऊ नये, याकरिता पांढरकवडा वनविभागातर्फे दोन कर्मचारी पाळत ठेवत असतात.
हजारोंची मिळकत
सायखेडा धरणावर दरवर्षी येणाऱ्या फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक मासेमारांच्या मदतीनेच ‘फ्लेमिंगो टुरिझम’ ही संकल्पना राबविली जाते. २०१६ मध्ये आलेल्या ३२ फ्लेमिंगोमुळे ३० हजारांची मिळकत झाली होती. तर यंदा ५१ फ्लेमिंगोमुळे कमाई वाढण्याचे संकेत आहे. मासेमार आपल्या बोटीतून ३०० रुपयांच्या मोबदल्यात पर्यटकांना धरणात घेऊन जातात. एका वेळी दोघांनाच नेले जाते. ३०० फूट अंतरावरून पर्यटक फ्लेमिंगो बघू शकतात, त्यांचे छायाचित्र घेऊ शकतात. ‘फ्लेमिंगो टुरिझम’मुळे मिळकत होत असल्याने स्थानिक नागरिकही या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी काळजी घेतात, असे डॉ. रमझान विराणी यांनी सांगितले.

Web Title: 51 Fleming's stay in the sidewalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.