शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ हजारांची मदत

By admin | Published: September 24, 2016 02:51 AM2016-09-24T02:51:35+5:302016-09-24T02:51:35+5:30

श्रीनगरमधील उरी येथे १८ सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वणी तालुक्यातील पुरड येथील विकास कुडमेथे याला वीरमरण आले.

51 thousand aid to the martyrs' families | शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ हजारांची मदत

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ हजारांची मदत

Next

बळीराजा चेतना अभियानाचा पुढाकार : महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून मदत
यवतमाळ : श्रीनगरमधील उरी येथे १८ सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वणी तालुक्यातील पुरड येथील विकास कुडमेथे याला वीरमरण आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना वैयक्तीक स्तरावर आर्थिक मदत करण्याचे आवाहन महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
उपजिल्हाधिकारी संवर्गातील आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपए मदतनिधी म्हणून जमा करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी पाच हजार रूपयांची मदत केली. तर तहसीलदार नायब तहसीदार संघटनेकडून १५ हजार रुपए व कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तीक स्तरावर आपल्या परीने मदत म्हणून आई विमल जर्नादन कुडमेथे आणि पत्नी स्नेहा कडमेथे यांना ५१ हजार चारशे रूपयांचा निधी प्रदान करण्यात येणार आहे. हा मदत निधी बळीराजा चेतना अभियान समितीच्या पुढाकाराने गोळा करण्यात आला आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली असून यामध्ये ५१ हजार ४०० रूपयांचा मदत निधी गोळा करण्यात आला. ही मदत वणी तहसीलदार जोगी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यांच्या मार्फत हा निधी शहिद विकास यांच्या आई विमल कुडमेथे व पत्नी स्नेहा कुडमेथे यांना विभागून देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 51 thousand aid to the martyrs' families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.