कारमधून ५५ किलो चांदी जप्त

By admin | Published: February 1, 2017 01:30 AM2017-02-01T01:30:58+5:302017-02-01T01:30:58+5:30

निवडणूक विभागाच्या पथकाने स्थानिक धामणगाव मार्गावरील मोहा फाटा येथे एका संशयास्पद कारची

55 kg of silver seized in the car | कारमधून ५५ किलो चांदी जप्त

कारमधून ५५ किलो चांदी जप्त

Next

मोहा फाट्यावरील प्रकार : निवडणूक पथकाची कारवाई
यवतमाळ : निवडणूक विभागाच्या पथकाने स्थानिक धामणगाव मार्गावरील मोहा फाटा येथे एका संशयास्पद कारची झडती घेतली असता तब्बल ५५ किलो वजनाचे चांदीचे दागिने आढळून आले. ही कारवाई मंगळवारी सकाळी १०.३० वाजता करण्यात आली. या दागिण्यासंदर्भात व्यापाऱ्याकडे कोणतचे अधिकृत दस्तऐवज उपलब्ध नसल्याने चांदी कोषागारात ठेवण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले.
यवतमाळ येथून कार (क्र. एमएच१२/एलडी^-२२४५) मंगळवारी धामणगाव मार्गाने जात होती. या कारमध्ये चालकासह तिघे जण बसून होते. मोहा येथील तपासणी नाक्यावर कार्यरत महिला पोलीस शिपाई निलीमा जांभुरे यांना संशय आल्याने कार तपासणीसाठी थांबविली. कारची तपासणी केली असता, डिक्कीत पाच बॅगमध्ये चांदीचे दागिणे आढळून आले. याबाबत व्यापारी जिग्नेश जयंतीलाल हिंडोचा (४०) रा. सिव्हील लाईन, यवतमाळ यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी संशयास्पद उत्तरे दिली. शिवाय दागिण्याबाबत कोणतेच अधिकृत दस्तऐवज त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे निवडणूक पथकाने वाहन तहसील कार्यालयात जमा केले. सदर दागिने बाबू उर्फ विक्की वसंत शहा (४२) रा. यवतमाळ यांचे असल्याचे सांगण्यात आले. शहा यांचे सराफा बाजारपेठेत तुलसी ज्वेलर्स आहे. तेथून दागिने काटोल येथे विक्री करीता नेत असल्याचे हिंडोचा याने सांगितले. या दागिण्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी राजेश खवले आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन शेजाळ यांनी व्यापाऱ्याकडे खुलासा मागितला. तेव्हा त्यांनी केवळ तीन किलो दागिण्याचेचे बिल सादर केले. त्यामुळे या प्रकरणात खवले यांनी दागिने पंचासमक्ष सील करून कोषागारात जमा करण्याचे निर्देश दिले.
शिवाय शहर पोलिसांना या अवैध दागिण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. तपासणी पथकाने अवैध चांदी मिळाल्याची माहिती शहर पोलिसांना दिली. मात्र वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. ५५ किलो चांदीचे दागिने असल्याचे व्यापारी जिग्नेश हिंडोचा याच्याकडून सांगण्यात आले होते. माळीपुरा येथील अनिल वनवे याची कार भाड्याने घेऊन ते काटोलकडे जात असल्याचे हिंडोचा यांनी सांगितले. या प्रकरणात प्रशासनाकडून संबंधित व्यापाऱ्याला खुलासा मागण्यात आला आहे. योग्य दस्तऐवज न मिळाल्यास याची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)

पहिलीच कारवाई
४जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आचारसंहिता काळात यवतमाळ पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई होय. या चांदीच्या दागिन्यांचा विक्रीकर विभागाकडूनही तपास होत आहे.

Web Title: 55 kg of silver seized in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.