13 मृत्युसह जिल्ह्यात 588 नव्याने पॉझिटीव्ह, 453 जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 07:05 PM2021-04-12T19:05:08+5:302021-04-12T19:05:50+5:30
सोमवारी एकूण 4034 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 588 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3446 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.
यवतमाळ: गत 24 तासात 13 मृत्युसह जिल्ह्यात 588 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 453 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 58, 48, 45, 80, 54, 70 वर्षीय पुरुष व 53 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 52 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 32 व 71 वर्षीय महिला, नेर शहरातील 55 वर्षीय पुरुष आणि उमरखेड येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 588 जणांमध्ये 360 पुरुष आणि 228 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 193 पॉझेटिव्ह रुग्ण, दिग्रस 51, पांढरकवडा 49, पुसद 45, वणी 43, कळंब 39, दारव्हा 38, महागाव 37, नेर 23, मारेगाव 19, बाभुळगाव 17, उमरखेड 12, आर्णि 11, घाटंजी 8 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.
सोमवारी एकूण 4034 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 588 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3446 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3307 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2094 तर गृह विलगीकरणात 1213 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 34638 झाली आहे. 24 तासात 453 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 30572 आहे. तर जिल्ह्यात एकूण 759 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.73 असून मृत्युदर 2.19 आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 315637 नमुने पाठविले असून यापैकी 313588 प्राप्त तर 2049 अप्राप्त आहेत. तसेच 278950 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.