पुसद उपविभागात ६० कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:43 AM2021-04-01T04:43:35+5:302021-04-01T04:43:35+5:30

ग्राहक वीज बिल भरत नसल्याने सुमारे दोन हजार १२४ ग्राहकांचे कनेक्शन बंद करण्यात आले आहे. तालुक्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ...

60 crore in Pusad sub-division | पुसद उपविभागात ६० कोटी थकीत

पुसद उपविभागात ६० कोटी थकीत

Next

ग्राहक वीज बिल भरत नसल्याने सुमारे दोन हजार १२४ ग्राहकांचे कनेक्शन बंद करण्यात आले आहे. तालुक्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ६० कोटी ९३ लाख ३० हजारांच्यावर थकबाकी आहे. शहरासह तालुक्यात ४३ हजार ५२५ घरगुती वीज ग्राहक आहे. त्यापैकी २३ हजार ९२४ थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडून पाच कोटी ८० लाख ९९ हजार येणे बाकी आहे. तालुक्यात ७६८ औदयोगिक ग्राहक आहेत. त्यांच्यापैकी ५६० थकबाकीदार आहे. त्यांच्याकडे एक कोटी ९४ लाख २३ हजार थकीत आहे. १३ हजार ७२२ शेतकऱ्याकडे वीज कनेक्शन आहे. त्यापैकी १३ हजार ५३२ शेतकऱ्यांकडे तब्बल ११ कोटी एक लाख ७७ हजार एवढी थकबाकी आहे. केवळ १८ शेतकऱ्यांनी दोन लाख दोन हजार रुपयांचा भरणा केला आहे.

बॉक्स

२९८९ वाणीज्यीक ग्राहक

तालुक्यात दोन हजार ९८९ वाणीज्यीक वीज ग्राहक आहे. त्यापैकी एक हजार ७१२ थकीत ग्राहक आहेत. त्यांच्याकडे एक कोटी एक लाख ७१ हजार रुपये थकीत आहे. या सर्व थकबाकीदारांनी लवकरात वीज बिलाचा भरणा करावा, असे आवाहन वीज अधिकारी एस.एस. आडे यांनी केले आहे.

Web Title: 60 crore in Pusad sub-division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.