कत्तलीस जाणाऱ्या ६३ बैलांची सुटका
By Admin | Published: April 9, 2017 12:45 AM2017-04-09T00:45:50+5:302017-04-09T00:45:50+5:30
नागपूर येथून नांदेडमार्गे हैद्राबाद येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या ६३ बैलांची आर्णी मार्गावर पोलिसांनी संयुक्त कारवाईद्वारे सुटका केली.
दहा जणांना अटक : पोलिसांची आर्णी मार्गावर कारवाई
यवतमाळ : नागपूर येथून नांदेडमार्गे हैद्राबाद येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या ६३ बैलांची आर्णी मार्गावर पोलिसांनी संयुक्त कारवाईद्वारे सुटका केली. पोलिसांनी दहा जणांना अटक केली.
रेहान खाँ शब्बीर खाँ, समीर खाँ शब्बीर खाँ, मोहमद नासीर मोहमद इशादोद्दीन कुरेशी, कमाल अहेमद मोहमद जलील, मोबीन खाँ मतीन खान, तासीब कुरेशी रहीम कुरेशी, अविनाश शिवपाल ढोके, राजू पंढरी चहांदे, सै.उस्मान सै.सुबान, मोहमद शहान नवाज मोहमद अनवारूल हक अन्सारी सर्व रा.कामठी नागपूर, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ते तीन ट्रकने (क्र.सी.जी.०४- जे.ए.७४९९), (क्र.एम.एच.४०-एन.७५१७), (क्र.एम.एच.४०-वाय.९०१७) बैलांची अमानुषपणे वाहतूक करीत असल्याची माहिती वाचक शाखेतील साजीद सैयद हशम यांना मिळाली. त्यांनी वडगाव रोड ठाण्याचे शोध पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाच्या मदतीने सापळा रचून ही कारवाई पार पाडली. (कार्यालय प्रतिनिधी)
पांढरकवडा येथे साडेसहा लाखांचे मांस जप्त
पांढरकवडा : नागपुरवरुन हैद्राबादकडे ३६ पेट्यांमध्ये जनावरांचे आठ टन मांस घेऊन जाणारा ट्रक कोदोरी-पिंपळखुटी मार्गावर पोलिसांनी शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पकडला. या मांसाची किंमत सहा लाख ४८ हजार रुपये आहे.याप्रकरणी नागपूर येथील मजहरखॉ इब्राहिमखॉ, सलमान खॉ हारुन खॉ व लतीफ कुरेश सुलेमान शेख या तीन आरोपींना अटक करण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरूच होती. शनिवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोहारे, ए.एस.आय गिरटकर, जमादार रंगलाल पवार, धर्मराज घायवटे, अफजल पठाण व विलास जाधव हे अवैध दारुभट्ट्यांवर धाड मारण्यासाठी चनाखा-कोदोरीकडे जात असताना त्यांना एक ट्रक कोदोरीकडून महामार्गाने हैद्राबादकडे जाताना दिसला. या ट्रकमधून मांसाचा वास येत असल्यामुळे त्यांनी हा ट्रक अडविला. ट्रकची तपासणी केली असता त्यांना मांस भरलेल्या पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, या ट्रकमध्ये ३६ पेट्यांमध्ये सीलबंद मांस आढळले.