६५८ कृषिपंपांची वीज तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:37 PM2017-10-31T23:37:20+5:302017-10-31T23:37:33+5:30
थकीत बिलापोटी महावितरणने कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला असून पुसद उपविभागातील पाच तालुक्यांतील तब्बल ६५८ कृषीपंपांचा वीज पुरवठा तोडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : थकीत बिलापोटी महावितरणने कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला असून पुसद उपविभागातील पाच तालुक्यांतील तब्बल ६५८ कृषीपंपांचा वीज पुरवठा तोडला आहे. अपुºया पावसामुळे संकटातील शेतकºयांना महावितरणनेही जबर झटका दिला.
वीज वितरण कंपनीच्या पुसद उपविभागाअंतर्गत उमरखेड, महागाव, पुसद, दिग्रस आणि दारवहा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. तालुक्यातील शेकडो शेतकºयांकडे कृषीपंपांचे वीज बिल थकीत आहे. दुष्काळी परिस्थतीमुळे शेतकरी वीज बिल भरू शकले नाही. त्यामुळे आता वीज वितरणने कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. पुसद उपविभागात पाच हजार ७२७ कृषीपंप आहेत. त्यापैकी पुसद तालुक्यातील ८८, दारव्हा ८३, दिग्रस ४७, महागाव १९५, उमरखेड १११ आणि ढाणकी १३४, अशा ६५८ कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित केला.
या पाच तालुक्यांत यावर्षी वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे कपाशी, ऊसाला पाण्याची आवश्यकता आहे. परंतु कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकºयांपुढे नवीन संकट उभे ठाकले आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
शेतकºयांच्या प्रश्नावर आंदोलनाची भाषा करणारे या विभागातील लोकप्रतिनिधी मात्र वीज पुरवठा खंडित होत असतानही चुप्पी साधून आहे. शेतकरी वीज वितरणच्या कर्मचारी आणि अधिकाºयांची विनवणी करीत असतानाही ही कारवाई होत आहे. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीने या विषयावर आवाज उठविला नाही.