अवैध सावकारी जाचातून 66 एकर जमीन मुक्त,10 मूळ शेतमालकांना जमिनीचा मिळाला ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 02:56 PM2017-11-07T14:56:15+5:302017-11-07T14:56:23+5:30

अडचणीच्या काळात तात्काळ पैसे उपलब्ध व्हावे म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी अवैध सावकाराकडून उसनवारी कर्ज घेऊन आपली गरज भागवितात. त्यासाठी ते आपली जमीन किंवा स्थावर मालमत्ता काही कालावधीसाठी सावकाराकडे  ठेवतात.

66 acres of land free from illegal moneylenders, 10 original holders get possession of land | अवैध सावकारी जाचातून 66 एकर जमीन मुक्त,10 मूळ शेतमालकांना जमिनीचा मिळाला ताबा

अवैध सावकारी जाचातून 66 एकर जमीन मुक्त,10 मूळ शेतमालकांना जमिनीचा मिळाला ताबा

Next

यवतमाळ- अडचणीच्या काळात तात्काळ पैसे उपलब्ध व्हावे म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी अवैध सावकाराकडून उसनवारी कर्ज घेऊन आपली गरज भागवितात. त्यासाठी ते आपली जमीन किंवा स्थावर मालमत्ता काही कालावधीसाठी सावकाराकडे  ठेवतात. मात्र याचा गैरफायदा घेऊन ती शेतजमीन लाटण्याचे प्रकार अवैध सावकारांकडून होत असते. आपली शेतजमीन परत मिळण्यासाठी तक्रारदारांनी या संदर्भात तक्रारी केल्या. या तक्रारींच्या आधारावर यवतमाळ येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाने कारवाई करून 66 एकर (26.30 हेक्टर) शेतजमीन अवैध सावकारी जाचातून मुक्त केली आहे. या जमिनी मूळ शेतमालकांना परत मिळाल्या असून आपल्या हक्काच्या जमिनीवर शेतकरी शेती करीत आहेत. 

खरीप आणि रब्बी हे शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे हंगाम आहेत. या हंगामाच्या भरोश्यावर शेतक-यांच्या कुटुंबाचा डोलारा वर्षभर चालत असतो. मात्र या काळात शेतीला लावण्यासाठी हाती पैसा नसला की त्याची संपूर्ण घडी विस्कळीत होते. त्यामुळे सावकारांकडून उसनवारी कर्ज घेऊन शेतकरी शेतीची कामे करतात. उत्पन्न निघाले की लगेच सावकाराकडून घेतलेले कर्ज परत करून आपली जमीन मिळण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. मात्र ही शेतजमीन लाखमोलाची असल्याने अवैध सावकार ती परत करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे आपल्या हक्काच्या शेतजमिनीपासून शेतक-यांना वंचित राहावे लागते. असे प्रकार जिल्ह्यात उघडकीस आले आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीवरून अवैध सावकांरानी हडप केलेली 66 एकर शेतजमीन शेतक-यांना परत मिळवून देण्यात आली आहे. 

अवैध सावकारीवर नियंत्रण आणि शेतक-यांची सावकारी जाचातून मुक्तता करण्यासाठी सावकारी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 मधील कलम 18 अंतर्गत अवैध सावकारीमधील खरेदी खत रद्द करून 10 शेतक-यांना त्यांच्या मूळ जमिनीचा ताबा मिळाला आहे. यात मिरासे खोपडी (ता.दारव्हा) येथील दारासिंह चव्हाण यांची 2 हेक्टर 03 आर. शेतजमीन, ईरथळ (ता.दारव्हा) येथील सरीता महादेव धोटे यांची 1 हेक्टर 54 आर. आणि 3 हेक्टर 21 आर. शेतजमीन, हातला (ता.उमरखेड) येथील दिनकर देवराव चंद्रवंशी यांची 0 हेक्टर 30 आर. शेतजमीन, शेलोडी (ता.दारव्हा) येथील नामदेव रामकृष्ण राऊत यांची 1 हेक्टर 03 आर. शेतजमीन, बिटरगाव (ता.उमरखेड) येथील राजराम तुकाराम भालगे यांची 0 हेक्टर 89 आर. शेतजमीन, मुडाणा (ता.महागाव) येथील अवधुत रामराव वानखेडे यांची 4 हेक्टर 45 आर. शेतजमीन, उमरखेड येथील कुसुम परसराम लांभाडे यांची 4 हेक्टर 12 आर. शेतजमीन, मुडाणा (ता.महागाव) येथील विनोद विठ्ठल घुमनर यांची  यांची 1.61 हेक्टर 89 आर. शेतजमीन आणि आर्णि येथील मनिष मारोतराव कपले यांची 6 हेक्टर 85 आर. शेतजमीन अशा एकूण 26 हेक्टर 30 आर. शेतजमिनीचा समावेश आहे.

जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेतजमिनी सावकाराने हडप केल्याची प्रकरणे असतील तर यासंदर्भात संबंधित उपनिबंधक कार्यालय, सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे.
 

Web Title: 66 acres of land free from illegal moneylenders, 10 original holders get possession of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.