67 हजार रेशन खाते स्लोडाऊन नियमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 05:00 AM2020-11-14T05:00:00+5:302020-11-14T05:00:09+5:30
यामुळे असे कार्डधारक स्लो डाऊनच्या नियमामध्ये गेले आहे. या कार्डधारकांचा वाटप बंद झाला असला तरी हे कार्डधारक पुन्हा धान्य खरेदीसाठी राशन दुकानांमध्ये गेल्यानंतर पुन्हा राशन मिळविण्यासाठी पात्र ठरणार आहे. त्याकरिता त्यांना पुरवठा विभागाच्या सुधारित नियमांचे पालनही करावे लागणार आहे.
रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात सहा लाख ३५ हजार ३३३ रेशन कार्डधारक आहेत. यापैकी पाच लाख ६७ हजार ७५६ रेशन कार्डधारकांनी धान्याचा उचल केला आहे. यामध्ये ६७ हजार ५५७ कार्डधारकांनी गत तीन महिन्यांपासून धान्याची उचलच केलाी नाही.
यामुळे असे कार्डधारक स्लो डाऊनच्या नियमामध्ये गेले आहे. या कार्डधारकांचा वाटप बंद झाला असला तरी हे कार्डधारक पुन्हा धान्य खरेदीसाठी राशन दुकानांमध्ये गेल्यानंतर पुन्हा राशन मिळविण्यासाठी पात्र ठरणार आहे. त्याकरिता त्यांना पुरवठा विभागाच्या सुधारित नियमांचे पालनही करावे लागणार आहे.
लाॅकडाऊनपासून राशन कार्डधारकांचा उचल वाढला आहे. यात मोफत धान्य उचलणाऱ्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. राशन दुकानांमधून गहू, तांदूळ, साखर आणि डाळ वितरित करण्यात येत आहे. सणासुदीच्या दिवसात रेशन दुकानापुढे सर्वाधिक गर्दी उसळल्याचे चित्र पहायला मिळते. पंतप्रधानांनी लाॅकडाऊनच्या काळात मोफत धान्याची घोषणा करताच नव्याने कार्ड बनविण्यासाठी हजारो नागरिक पुढे आले. ५४ हजार १४२ नागरिकांनी आपले राशन कार्ड बनविले. यामध्ये शेतमजूर आणि इतर काम करणाऱ्या नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. नवीन कार्डधारकांमुळे धान्याचा उचलही वाढला आहे. गहू, तांदूळ, साखर आणि डाळ या वस्तू कार्डधारक नियमित वापरासाठी नेत आहेत.
साखर, डाळ रेशनमध्ये
दिवाळीच्या पर्वात रेशन दुकानांमध्ये गहू, तांदूळ या वस्तूसोबतच साखर आणि डाळ वितरित करण्यात येत आहे. चना डाळ जिल्ह्याला पाठविण्यात आली आहे. नियमित धान्य वितरणासोबतच मोफत धान्यामधूनही या वस्तू कार्डधारकांना दिल्या जात आहेत.
जिल्ह्यातील दोन हजार ३९ दुकानांमधून रेशन वितरित होते. धान्य वितरणामध्ये यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. राज्यात ६ व्या क्रमांकावर तर विभागामध्ये टाॅपवर आहे.
- सुधाकर पवार,
जिल्हा पुरवठा अधिकारी