पुसद उपविभागात ७० टक्के पेरणी उलटली

By admin | Published: July 25, 2014 12:05 AM2014-07-25T00:05:04+5:302014-07-25T00:05:04+5:30

पुसद कृषी उपविभागातील ७० टक्के पेरणी उलटली असून ६० हजार हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तीन दिवस तुषार सिंचनासारखा पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

70% of sowing has been completed in Pushad subdivision | पुसद उपविभागात ७० टक्के पेरणी उलटली

पुसद उपविभागात ७० टक्के पेरणी उलटली

Next

अशोक काकडे - पुसद
पुसद कृषी उपविभागातील ७० टक्के पेरणी उलटली असून ६० हजार हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तीन दिवस तुषार सिंचनासारखा पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र दुबार पेरणीचे संकट अनेक शेतकऱ्यांवर घोंगावत आहे. उशीरा होणाऱ्या पेरणीचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होण्याची भीती आहे.
पुसद कृषी उपविभागात पुसद, उमरखेड, महागांव, दिग्रस या तालुक्यांचा समावेश आहे. उपविभागाचे भौगोलिक क्षेत्र ३ लाख ६० हजार हेक्टर असून वाहितीखाली २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख ७१ हजार हेक्टरवर पेरण्या अटोपल्या आहेत. यंदा आकाशात ढग जमले परंतू बरसलेच नसल्याने जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांचे पहिल्या पेरणीचे नुकसान झाले आहे. तीन दिवसाच्या पावसाने बियाण्याला अंकुर फुटले असले तरी वाहुन जाण्यासारखा एखादा पाऊस येण्याची वाट शेतकरी पाहत आहे. उपविभागात पिकाला पोषक पाऊस पडला असला तरी जमिनीची तहान अद्यापही भागलेली नाही. साधारणत:
उपविभागातील अटोपलेल्या पेरणीमध्ये पुसद तालुक्यात ७४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २३ हजार ६७४ हेक्टर सोयाबीन आणि कापूस २१ हजार ७०३ हेक्टर क्षेत्रामध्ये पेरण्यात आला. दिग्रस तालुक्यात ३७ हजार ५४ हेक्टर पैकी सोयाबीन १३ हजार ५३० हेक्टरवर आणि कापूस १६ हजार ९९७ हेक्टर लागवड झाली. उमरखेड तालुक्यात ६६ हजार ७५६ क्षेत्रापैकी सोयाबीन ५ हजार ७४४ आणि कापूस १२ हजार ४९० हेक्टरवर तर महागांव तालुक्यातील ६० हजार ४०४ हेक्टर क्षेत्रापैकी सोयाबीन १९ हजार १५० आणि कापूस ३१ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. उपविभागातील २ लाख ३८ हजार ९१७ हेक्टरपैकी कापूस, सोयाबीन व इतर पिकांची १ लाख ७१ हजार २४६ हेक्टरवर पेरण्या केल्या. आता ७० टक्के पेरणी उलटली असून शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करवावी लागत आहे. बियाण्याच्या पैशासाठी दुसऱ्याकडे हात पसरावे लागते.

Web Title: 70% of sowing has been completed in Pushad subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.