यवतमाळ जिल्ह्यातील ७० हजार नागरिकांचे ‘जीवन’ टँकरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:03 PM2019-06-12T14:03:50+5:302019-06-12T14:05:06+5:30
उन्हाचा वाढता पारा, कोरडे पडलेली जलाशये आणि घसरलेली भूजल पातळी यामुळे जिल्ह्यातील ३९१ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. या गावाची संपूर्ण मदार टँकरच्या पाण्यावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उन्हाचा वाढता पारा, कोरडे पडलेली जलाशये आणि घसरलेली भूजल पातळी यामुळे जिल्ह्यातील ३९१ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. या गावाची संपूर्ण मदार टँकरच्या पाण्यावर आहे.
गतवर्षी जिल्ह्यात ७१ मिमी पावसाची नोंद झाली. यातून जेमतेम भरलेले जलाशय मार्चपासून कोरडे पडण्यास सुरवात झाली. जिल्ह्यातील २५१ गावतलाव आणि १५ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात १७.५० टक्के पाणी शिल्लक आहे.
जिल्ह्यातील ३९१ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांना ६९ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा सुरू आहे. या गावातील ७० हजार नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत नागरिक पाण्याच्या शोधात असतात. गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही भीषण आहे. चारा छावण्या उघडण्याची मागणी पशुधन पालकांमधून होत आहे.