यवतमाळ जिल्ह्यात ७१ जण कोरोनामुक्त; 55 नव्याने पॉझेटिव्ह, दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 05:54 PM2020-10-29T17:54:01+5:302020-10-29T17:54:28+5:30
Yawatmal News corona वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 71 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 71 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात 55 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला.
मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिला आणि नेर तालुक्यातील माणिकवाडा धनज येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.29) रोजी एकूण 380 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 55 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 325 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 364 ?क्टीव्ह पॉझेटिव्ह असून यात होम आयसोलेशन मधील 127 पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10088 झाली आहे.
गुरुवारी 71 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8993 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 346 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 90299 नमुने पाठविले असून यापैकी 89911 प्राप्त तर 388 अप्राप्त आहेत. तसेच 79823 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.