यवतमाळात ८ दिवसाच्या लॉकडाऊनचे सावट; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत,चार तालुके हॉटस्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 02:25 PM2021-03-03T14:25:39+5:302021-03-03T14:25:57+5:30

गेल्या वर्षभरात मंगळवारी सर्वाधिक ५११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

8-day lockdown in Yavatmal; Clear indication of Collector, four taluka hotspots | यवतमाळात ८ दिवसाच्या लॉकडाऊनचे सावट; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत,चार तालुके हॉटस्पॉट

यवतमाळात ८ दिवसाच्या लॉकडाऊनचे सावट; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत,चार तालुके हॉटस्पॉट

Next

यवतमाळ : जिल्ह्यात मंगळवारी कोरोना ब्लास्ट झाला असून आतापर्यंतची सर्वाधिक ५११ ही रुग्णसंख्या नोंदविली गेली. त्यामुळे जनतेच्या हितासाठी सावधगिरी म्हणून पुढील आठ दिवस जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर केला जात आहे. त्याबाबतचे स्पष्ट संकेत बुधवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात मंगळवारी सर्वाधिक ५११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. त्यातील १७५ रुग्ण यवतमाळ तर १६५ पुसदमधील आहेत. सावधगिरी म्हणून आता कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासणीची संख्या वाढविण्यात आली आहे. पूर्वी दरदिवशी दीड हजार तपासणीचे असलेले हे उद्दीष्ट आता दुप्पट करून तीन हजार केले गेले आहेत. जिल्ह्यात सध्या १२० प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय पथकाचे डॉ. आशिष रंजन यांनी नुकतीच येथे भेट देऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्रीय पथकानेही जिल्ह्यात किमान आठ दिवसाच्या लॉकडाऊनची शिफारस केली आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी टास्क फोर्सची बैठक बोलविण्यात आली आहे. लाॅकडाऊन लावायचा का आणि लावल्यास त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची याबाबतचा अहवाल संबंधित प्रत्येक अधिकाऱ्याकडून मागितला जाणार आहे. त्यानंतरच लॉकडाऊन बाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे  जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेता लाॅकडाऊन गरजेचा वाटत असून नागरिकांनी काही दिवस कड सोसणे आवश्यक असल्याचे व जागरुकता, सहकार्य अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

चार तालुके बनले ‘हॉटस्पॉट’

सध्या दिग्रस, पुसद, दारव्हा व यवतमाळ हे चार तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. तेथील नगरपालिका क्षेत्रासोबतच लगतच्या ग्रामीण परिसरातूनही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांचा आकडा १५ हजार ८०० च्या पुढे गेला आहे. तर मृतांची संख्या ४६७ झाली आहे. सद्यस्थितीत एक हजार ८०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: 8-day lockdown in Yavatmal; Clear indication of Collector, four taluka hotspots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.