४० वाहनांना आठ लाख दंड
By Admin | Published: July 13, 2017 12:17 AM2017-07-13T00:17:07+5:302017-07-13T00:17:07+5:30
तालुक्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन महसूल विभागाने तब्बल ४० वाहनांवर कारवाई केली असून, त्यांच्यावर
अवैध गौण खनिज उत्खनन : उमरखेडच्या महसूल यंत्रणेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन महसूल विभागाने तब्बल ४० वाहनांवर कारवाई केली असून, त्यांच्यावर आठ लाख दोन हजार १०० रुपये दंड आकारला आहे. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने ११ जुलैच्या अंकात ‘पैनगंगा पात्रात रात्रीच्या अंधारात रेती तस्करी’ असे वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे महसूल विभाग खडबडून जागा झाला.
उमरखेड तालुक्यात रेती, मुरूम, डब्बर, लाल माती आदी गौण खनिजाचे अवैध उत्खनन करण्याचा धडका तस्करांनी लावला आहे. यामुळे शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. या तस्करांविरुद्ध महसूल विभागाने धडक मोहीम सुरू केली. तहसीलदार भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनात वालतूर, उमरखेड, ब्राह्मणगाव, पिंपळगाव, निंगणूर, कारखेड, गौरलेगाव, विडूळ, चुरमुरा, बोरी चातारी, ढाणकी, देवसरी, लोहरा, बाळदी, इसापूर, झाडगाव, टेंभूरदरा, मेट, हरदडा, पोफाळी, बोरगाव, सावळेश्वर आदी ठिकाणी ४० वाहने पकडण्यात आली. त्या वाहनांवर आठ लाख दोन हजार १०० रूपये दंड ठोठावला. महसूल विभागाने सुरू केलेल्या धडक मोहिमेने तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदी पात्रातून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. स्थानिकांना हाताशी धरून ही तस्करी सुरू आहे. यासंदर्भात लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले. त्यांचीच दखल घेत महसूल विभागाने कारवाईचा धडका लावला.