८० लाखांच्या गौण खनिजाची चोरी
By admin | Published: January 18, 2015 10:49 PM2015-01-18T22:49:16+5:302015-01-18T22:49:16+5:30
गौण खनिजांची चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचली आहेत. गेल्या तीन महिने रेतीघाट लिलावाच्या प्रतिक्षेत होते. याच संधीचा फायदा घेत वाळू माफियांनी रेतीघाटांवर डल्ला मारला.
यवतमाळ : गौण खनिजांची चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचली आहेत. गेल्या तीन महिने रेतीघाट लिलावाच्या प्रतिक्षेत होते. याच संधीचा फायदा घेत वाळू माफियांनी रेतीघाटांवर डल्ला मारला. इतकेच नव्हे तर गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी झाली. वर्षभरात ९८२ चोरींचे प्रकरणे उघड झाली आहेत. ही चोरी ८० लाखांच्या घरात आहे.
जिल्ह्यात असलेली प्रचंड भूसंपदा आणि त्यावर असलेली खनिज संपदा विपूल आहे. रेती घाट, मुरूम, चुनखडी, विटभट्टीसाठी लागणारी माती या गौणखजिन्यांची मोठ्या प्रमाणात चोरी होते. स्थानिक तलाठयांकडे गौण खनिजाच्या चोरीवर निर्बंध ठेवण्याची जबाबदारी आहे. असे असले तरी एका तलाठ्याकडे अनेक गावे येतात. तलाठी मुख्यालयी राहत नाही. याच संधीचा फायदा घेत गौण खनिज चोरट्यांनी जिल्ह्यातील विविध भागात धुमाकूळ सूरू केला आहे. गौण खनिजावर अवैधरित्या डल्ला मारून लाखोंचा महसूल बुडविला आहे. यातील काही प्रकरणे उघड झाली आहे. ९८२ प्रकरणात चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अधिकृत आणि रेकॉर्डवर नसलेल्या रेतीघाटांमधून मोठया प्रमाणात रेतीची चोरी झाली आहे. या चोरीस गेलेल्या रेतीने प्रशासनाच्या महसुलात घट आणन्याचे काम केले आहे. मर्यादित क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात उपसा झाल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. यानंतरही प्रशासन यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहे. (शहर वार्ताहर)