‘मेडिकल’च्या ८५ बदली कर्मचाऱ्यांचे कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 09:57 PM2019-02-25T21:57:13+5:302019-02-25T21:57:26+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १९९६ पासून बदली कर्मचारी कार्यरत होते. अस्थायी स्वरूपात असलेल्या या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने डिसेंबर २०१५ मध्ये नियमित करण्याचा आदेश काढला. याचा लाभ यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी वगळून राज्यातील ६२९ कर्मचाऱ्यांना मिळाला. अन्यायाविरुद्ध यवतमाळातील कर्मचाºयांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १९९६ पासून बदली कर्मचारी कार्यरत होते. अस्थायी स्वरूपात असलेल्या या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने डिसेंबर २०१५ मध्ये नियमित करण्याचा आदेश काढला. याचा लाभ यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी वगळून राज्यातील ६२९ कर्मचाऱ्यांना मिळाला. अन्यायाविरुद्ध यवतमाळातील कर्मचाºयांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
यवतमाळ मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता यांनी डीएमईआरकडे चुकीचा अहवाल सादर केला. सलग २४० दिवसांची सेवा भरत नसतानाही इतर महाविद्यालयात लाभ देण्यात आला. येथील अधिष्ठातांच्या चुकीमुळे कर्मचाºयांवर मोठा अन्याय झाला आहे. महाविद्यालयाचा बॅकबोन म्हणून अस्थायी चतुर्थ श्रेणी कर्मचारी ओळखल्या जातो. यवतमाळातील ८५ कर्मचारी एकाच वेळी संपावर गेले आहेत. या कर्मचाºयांपैकी २५ जणांना अपात्र ठरवून सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश डीएमईआरने दिले. सेवेत नियमित करण्याऐवजी बडतर्फ करण्याचा अन्यायकारक आदेश धडकल्याने हे कर्मचारी हादरले आहे. मुळात यवतमाळच्या अस्थायी कर्मचाºयांनीच नियमित करण्यासाठी लढा उभारला होता. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या. मात्र याचा लाभ त्यांना मिळाला नाही. डीएमईआरने सुधारित अहवाल मागवून सेवेत नियमित करावे, अशी मागणी या कर्मचाºयांची आहे. तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.