9 जणांचा मृत्यू; 197 नव्याने पॉझेटिव्ह, बरे झालेल्या 150 जणांना सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 08:37 PM2020-09-04T20:37:05+5:302020-09-04T20:37:05+5:30
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 75 वर्षीय पुरुष व इतर दोन पुरुष, राळेगाव तालुक्यातील 44 वर्षीय महिला, दारव्हा शहरातील 58 वर्षीय पुरुष, आर्णि शहरातील 54 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील इतर दोन पुरुषाचा समावेश आहे.
यवतमाळ : आयसोलेशन वॉर्ड व जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 150 जण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात तब्बल नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 197 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 75 वर्षीय पुरुष व इतर दोन पुरुष, राळेगाव तालुक्यातील 44 वर्षीय महिला, दारव्हा शहरातील 58 वर्षीय पुरुष, आर्णि शहरातील 54 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील इतर दोन पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 197 जणांमध्ये 124 पुरुष व 73 महिला आहेत. यात दिग्रस शहरातील 10 पुरुष व 12 महिला, पांढरकवडा शहरातील सात पुरुष व पाच महिला, पांढरकवडा तालुक्यातील तीन पुरुष व एक महिला, महागाव शहरातील 11 पुरुष व दोन महिला, उमरखेड शहरातील 10 पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील 21 पुरुष व 10 महिला, वणी शहरातील चार पुरुष, वणी तालुक्यातील दोन पुरुष, घाटंजी शहरातील नऊ पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यातील पाच पुरुष व नऊ महिला, आर्णि शहरातील पाच पुरुष व सहा महिला तसेच तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, नेर शहरातील तीन पुरुष व चार महिला, यवतमाळ शहरातील 26 पुरुष व 18 महिला तसेच तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील चार पुरुष व दोन महिला, अकोला शहरातील एक महिला, अमरावती तालुक्यातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 725 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 251 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 3924 झाली आहे. यापैकी 2839 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 108 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 207 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज (दि.4) 149 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 53209 नमुने पाठविले असून यापैकी 49905 प्राप्त तर 3304 अप्राप्त आहेत. तसेच 45981 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.