९६ टक्के ‘गुरूजी’ परीक्षेत नापास!, टीईटीचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:38 AM2017-10-24T05:38:24+5:302017-10-24T05:38:28+5:30
वणी (यवतमाळ) : शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाºया ९६ टक्के शिक्षकांना टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होता आले नाही. केवळ तीन ते चार टक्के डीएड, बीएडधारक शिक्षक होण्यास पात्र ठरले आहेत.
विनोद ताजने
वणी (यवतमाळ) : शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाºया ९६ टक्के शिक्षकांना टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होता आले नाही. केवळ तीन ते चार टक्के डीएड, बीएडधारक शिक्षक होण्यास पात्र ठरले आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणा-या डीएड, बीएड उमेदवारांमधून शिक्षकांची निवड करण्याची अट आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २२ जुलै २०१७ ला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली. सोमवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
या परीक्षेसाठी पहिली ते पाचवीकरिता मराठी माध्यमाचे एक लाख ४२ हजार ५१ परीक्षार्थी, इंग्रजी माध्यमाचे पाच हजार १५२ व उर्दू माध्यमाचे ११ हजार ४७ असे एक लाख ५८ हजार २५० परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ सहा हजार ७६३ परीक्षार्थी शिक्षक बनण्यास पात्र ठरले.
अर्थात तब्बल ९५.७३ टक्के परीक्षार्थी या परीक्षेत अपात्र ठरले आहेत. तसेच सहावी ते आठवीसाठी मराठी माध्यमातून एक लाख आठ हजार ९७२, इंग्रजी माध्यमासाठी पाच हजार १७८ आणि उर्दू माध्यमासाठी चार हजार ४०२ असे एक लाख १८ हजार ५६१ परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ दोन हजार ७३२ (२.३०%) परीक्षार्थी शिक्षक बनण्यास पात्र ठरले आहे.