दारूच्या नशेत नवऱ्याने केला पत्नीचा खून, दोघेही होते व्यसनाधीन

By सुरेंद्र राऊत | Published: January 1, 2023 08:26 PM2023-01-01T20:26:48+5:302023-01-01T20:27:35+5:30

रविवारी दुपारची घटना सायंकाळी उघड

A drunken husband killed his wife, both were addicts | दारूच्या नशेत नवऱ्याने केला पत्नीचा खून, दोघेही होते व्यसनाधीन

दारूच्या नशेत नवऱ्याने केला पत्नीचा खून, दोघेही होते व्यसनाधीन

googlenewsNext

यवतमाळ : शहरातील वाघापूर परिसरातील पंचशीलनगरमध्ये दारूच्या नशेत नवऱ्याने बायकोला गुंडाने मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी दुपारी घडली. सायंकाळी महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. दोघेही दारूच्या आहारी गेले होते. नशेत असताना त्यांचे भांडण झाले. यातून ही घटना घडली.

वैशाली उत्तम गाडेकर (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी सकाळी वैशाली व उत्तम दोघेही दारू पिले. यातूनच वाद झाला. पती उत्तमने वैशालीला काठीने, नंतर गुंडाने बेदम मारहाण केली. यात वैशालीचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. या दोघांमध्ये दारू पिऊन नेहमीच वादावादी होत होती. त्यामुळे शेजाऱ्यांनीही सुरुवातीला याकडे लक्ष दिले नाही. मात्र, घरातील तीन वर्षांची मुलगी व दोन वर्षांचा मुलगा सारखे रडत असल्याने सायंकाळी घरात डोकावून बघितले.

त्यावरून हा प्रकार उघडकीस आला. लोहारा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. जखमी वैशालीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी वैशालीचे वडील ज्ञानेश्वर बारकू कोमटी (रा.उत्तरवाढोणा) यांनी मुलीचा खून झाल्याची तक्रार दिली आहे. त्यावरून लोहारा पोलिसांनी आरोपी उत्तम गाडेकर (४०) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपी पतीचा शोध सुरू आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरात खुनाची घटना घडली.

मुलं झाली बेवारस
दारूड्या पतीने नशेत पत्नीचा खून केला. या घटनेत गाडेकर दाम्पत्याची दोन्ही मुले बेवारस झाली आहेत. तीन वर्षांची मुलगी व दोन वर्षांचा मुलगा यांना अजूनही आपल्या घरात काय झाले, याची जाणीव नाही. तूर्त आजोबा ज्ञानेश्वर कोमटी यांच्या ताब्यात ही दोन्ही चिमुकली आहेत.

Web Title: A drunken husband killed his wife, both were addicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.