मोबाईल टॉवरवर झिंगाट पार्टी; धिंगाण्यानं गाव झाला जमा...पोलीस आले, अग्निशमन दलाचे जवानही आले अन्...

By सुरेंद्र राऊत | Published: September 18, 2022 03:50 PM2022-09-18T15:50:35+5:302022-09-18T15:55:50+5:30

थ्रीलसाठी काेण काय करेल याचा नेम नाही. यवतमाळच्या भाेसा येथे दाेन दारूडे चक्क माेबाईल टाॅवरवर बसून दारू प्यायले, दारूची नशा चढल्यावर त्यांना काही सुधरत नव्हते, आरडओरडा सुरू केला.

A party of drunkards sitting on the Mobile Tower police came takes action | मोबाईल टॉवरवर झिंगाट पार्टी; धिंगाण्यानं गाव झाला जमा...पोलीस आले, अग्निशमन दलाचे जवानही आले अन्...

मोबाईल टॉवरवर झिंगाट पार्टी; धिंगाण्यानं गाव झाला जमा...पोलीस आले, अग्निशमन दलाचे जवानही आले अन्...

googlenewsNext

यवतमाळ :

थ्रीलसाठी काेण काय करेल याचा नेम नाही. यवतमाळच्या भाेसा येथे दाेन दारूडे चक्क माेबाईल टाॅवरवर बसून दारू प्यायले, दारूची नशा चढल्यावर त्यांना काही सुधरत नव्हते, आरडओरडा सुरू केला. खाली कसे उतरायाचे असा प्रश्न त्यांच्या पुढे हाेता. अग्निशमन दल आणि पाेलिसांनी त्यांना सुखरूप खाली उरतवीले. दारूड्यांची ही कराम पाहण्यासाठी रविवारी सकाळी परिसरात माेठी गर्दी जमली हाेती.

निकेत गाढवे आणि राकेश चव्हाण अशी त्यांची नावे. दोघांनी दारूची नशा करण्यासाठी चक्क टॉवरवर बैठक मांडली. त्या उंच ठिकाणी यथेच्छ दारू ढोसल्यावर त्यांना चांगलीच झिंग चढली. टॉवरवरून आरडाओरड आणि डायलॉगबाजी सुरू झाल्याने अख्खा परिसर गोळा झाला. दोघांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने कुटुंबियांची रडारड सुरू हाेती. अवैध दारूविक्रीसाठी जबाबदार असलेल्या पोलिसांना त्यांच्या बचावासाठी बोलाविण्यात आले. अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले आणि त्यांनी दारुड्यांना सुखरूप उतरविले. उंच टॉवरवर चढून अग्निशमन दलाचे विपीन रहांगडाले, मोनील ओंकार, उमेश बाजोरिया, निलेश बिसेन, रोहित इमलीकर, रवी चौधरी, योगेश यादव यांनी हे बचावकार्य पार पाडले.

या संपूर्ण प्रकाराणे महिलांनी पोलिसांच्या कारभारावर रोष व्यक्त केला. भोसा येथे अवैध दारू, गांजा विक्रीचे अनेक अड्डे झाल्यामुळे कर्त्या पुरुषांना, तरुण, शाळकरी मुलांना दारू, गांजाचे व्यसन जडले आहे. परिणामी गुन्हेगारी वाढली असून महिला मुलींना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
पोलीस मागणी करूनही कारवाई करीत नसल्याने यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला. काही महिन्यापूर्वी दारुडे आणि नशा करणाऱ्यांच्या त्रासाने महिला नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा देखील काढला होता, वंदे मातरम चौक ते भोसा, चापडोह परिसरात अवैध धंदे राजरोस पणे सुरु असल्याने परिसर संवेदनशील बनला आहे. या भागात पोलीस चौकी असावी, व अवैध प्रकार पोलिसांनी थांबवावे अशी मागणी नागरिकांची आहे.

Web Title: A party of drunkards sitting on the Mobile Tower police came takes action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.