भरधाव कारची दुचाकीला धडक, दोन महिलांसह युवक जखमी 

By सुरेंद्र राऊत | Published: May 14, 2024 12:03 AM2024-05-14T00:03:21+5:302024-05-14T00:04:03+5:30

दोन महिलेसह दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तातडीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

A speeding car collided with a two-wheeler, two women and a youth were injured | भरधाव कारची दुचाकीला धडक, दोन महिलांसह युवक जखमी 

भरधाव कारची दुचाकीला धडक, दोन महिलांसह युवक जखमी 

यवतमाळ: शहरातील स्टेट बँक चौक ते वाघापूर नाका जाणाऱ्या मार्गावर शिवाजी शाळेसमोर भरधाव कारणे दुचाकी स्वार तिघांना धडक दिली. हा अपघात रात्री 10.45  वाजता झाला. या दोन महिलेसह दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तातडीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

घटनास्थळी पोहोचून शहर पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली कारचालक मात्र घटनास्थळावरून प्रसार झाला आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहर ठाण्यातील शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक संजय आत्राम यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले अधिक तपास सुरू आहे.

Web Title: A speeding car collided with a two-wheeler, two women and a youth were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात